पोस्ट्स

एक होता फुकट्यांचा देश

इमेज
  सध्याच्या भारत शासन तथा राज्य शासन यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा अभ्यास केला अस ता भारत हा लवकरच एक फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे . जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा अशी परिस्थिती आज भारतात सगळीकडे आहे . येथील जनतेला सुविधा व विकास तर ह वा आहे पण क्तिक स्वा र्थापुढे त्या गौण ठ तात . घरासमोरील रस्त्याऐवजी प्रत्येक घरी हजार रुपये वाटले की काम झाले . नेमकी हीच मानसिकता ओळखून राजकारण्यांनी फुकटखोरीचा सपाटाच लावला आहे . फुकट मिळाल्यास विष पण विकत घेणार अशी मानसिकता समाजात होऊन बसली आहे . गरज नसतांना महिला गावोगावी फिरत आहेत . तीर्थाटनाला तर जसे उधाण आले आहे . परिस्थिती ही आहे की बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही . निराधार योजना आणली पण भक्कम आधार असणारे लोक सुद्धा या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत . मोफत योजनांचा पाऊस पडत आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मोफत घरे , पाच लाखापर्यंतचे आरोग्य विमे , मोफत धान्य . थोडक्यात काय तर मध्यमवर्गीय , नोकरदार , आणि करदाते सोडले तर एकही घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही . वरून जनतेची ओरड आहे...

आपण तयार आहोत का?

इमेज
जगाच्या निर्मितीपासूनच सगळा डोलारा अद्यापही निसर्गाने अगदी व्यवस्थित सांभाळला आहे आणि त्यामुळेच उत्क्रांती प्रक्रियेतून मानवाची निर्मिती शक्य झाली. मानवाला कधी कधी ह्या गोष्टीचा विसर पडतो आणि मग त्याला आठवण करून देण्यासाठी निसर्ग आपली खेळी करतो. जगात कोरोना साथीची सुरुवात होऊन जवळ जवळ दहा महिने होत आले. आणि संपूर्ण धोका टळायला दोनेक वर्षे तरी लागतील. त्यानंतर कदाचित मग ही साथ इतिहासात जमा होईल घेतलेल्या बळींच्या संख्येसहीत. अशा महामारीच्या निवारणात घडलेल्या इतिहासातील चुकांमधून आपण काही शिकलो आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे.  गेल्या तीनशे वर्षात विज्ञान क्षेत्रात झालेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेता आपण मानवजातीने एव्हाना अशा संकटांसाठी तयार असायला हवे होते, पण तसे होत नसते. प्रगतीचे परिणाम हे सर्वंकष असतात, त्याची फक्त उजवी बाजू लक्षात घेऊन स्वत:ची पाठ थोपटत राहिल्यास, एक डोळ्यांनी न दिसू शकणारा विषाणूसम जीव देखील तुम्हाला नामोहरम करून तुमची पायरी दाखवून देऊ शकतो. कोरोना महामारीच्या फैलावात चीनचा सहभाग हा आंतराष्ट्रीय अन्वेषणाचा विषय आहे म्हणून सध्यातरी आपण ही साथ ...

एक छोटीशी पुडी

इमेज
एक छोटीशी पुडी. परंतु या पुडीची मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती मात्र महान आहे. खरं तर लोकांच्या खिशात ही पुडी असते, तरी करोडो लोकांना या पुडीने खिशात घातले आहे. मी कशाबद्दल बोलतोय ह्याची कल्पना एव्हाना तुम्हाला आलीच असेल. होय मी बोलतो आहे त्या गुटख्याच्या पुडीबद्दल. तीच गुटख्याची पुडी जिने गेली काही दशके सामान्य जनतेच्या मनावर राज्य केले आहे. तीच पुडी जिच्या कारनाम्यांनी तद्दन उशीरा का होईना परंतु सरकारांना जाग आली आणि त्यांनी पुडीवर निर्बंध घातले. ह्या पुडीने भारताची बऱ्यापैकी युवाशक्ती गिळून टाकली आहे. जास्त प्रभाव हा ग्रामीण युवकांवर दिसून येतो. काम असो नसो, गावातील ठरलेल्या मोक्याच्या ठिकाणी या युवकांचे टोळके जमते आणि सर्वात मुख्य आकर्षण असते गुटख्याच्या पुड्या. एक पुडी फोडून अर्धी अर्धी खाल्ली म्हणजे जणू काही शोलेच्या जय-वीरूची मैत्री आहे ह्या आवेशात ही युवा मंडळी वावरतअसते. रोज दोन-तीन रुपयांची पुडी खाणाऱ्याला जर कुणी ५-१० रुपयाला मिळणारी उच्चवर्गीय गुटखा पुडी देऊ केली की त्याला स्वर्ग ठेंगणा होतो. जणू दररोज देशी ढोसणाऱ्या दारुड्याला कुणी इंग्रजी स्कॉचची बाटली भेट द्यावी. सकाळी ...

मनाचा कळफलक

इमेज
बरेचदा आपण आपल्याही नकळत उदास होऊन जातो. किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर आपली चिडचिड व्हायला लागते. कारण कळत नाही.  किंवा असे म्हणू की त्यावेळी आपण कारण शोधत बसत नाही. आपण फक्त होणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होत राहतो, प्रतिक्रिया देत राहतो. कधी कधी घरी दूरचित्रवाणीसमोर बसून बातम्या किंवा एखादा कार्यक्रम बघत असतांना मुलांचा गोंधळ चालू होतो. त्यामुळे आपल्याला ऐकण्यात अडथळा येतो. मग हळूहळू चिडचिड व्हायला लागते. असं जर दोन-तीनदा झालं तर आपण मुलांवर ओरडतो किंवा खेकसतोसुद्धा. कधी कधी तर पाठीत दोन धपाटे पण घालून देतो. काही वेळाने किंवा दिवसाअखेरी आपल्याला आपल्या कृतीचं वाईट वाटतं. आपण उगाच रागावलो असं वाटतं आणि तेच बरोबर असतं. हे क्वचित होत असेल तर हरकत नाही. कधी कधी अशी प्रतिक्रिया मुलांना काही बाबतीत मर्यादा घालून देण्यास उपयुक्त ठरते. परंतु हे चित्र जर तुमच्या घरात वारंवार उद्भवत असेल तर मात्र अवलोकन करणे गरजेचे आहे. आपण मनोरंजनासाठी दूरचित्रवाणीसमोर बसतो, कधी कधी सवयीने बसता. परंतु ही क्रिया वरवरची असते. आपल्या मनात मात्र वेगळे विचार, काही प्रश्न किंवा एखाद्या चिंतेचा भुंगा सारखा भुणभुणत अस...

सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं

इमेज
इतकंही सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं. हो म्हणजे खरंच काही मौलिक लिहायचं म्हटलं तर ते सोपं नसतं. नुसती दिनचर्या खरडून काढण्यात काही अर्थ नसतो. तर प्रत्येक दिवशी तुम्ही जे जगलात ते अगदी प्रामाणिकपणे ह्या पानावर उतरवणं सोपं नसतं. त्यासाठी तयारी लागते बऱ्याच गोष्टींची. एकतर माणसाने खरच जगायला हवं, ही पहिली गोष्ट. कारण येणारा दिवस कसाबसा ढकलून लावत, रहाटगाडग्यात अडकलेल्या पोहऱ्याप्रमाणं जगण्याला जर कुणी जगणं म्हणत असेल तर त्या माणसाला जीवन अजून कळालेलंच नाही. त्याच्या जगण्याची अजून सुरुवातच झाली नाही. होणारही नाही कदाचित, आयुष्य असंच निघून जाईल. माणसं तीच जगतात जी प्रत्येक क्षणाची साक्षी असतात. जेवतांना ती फक्त जेवतात, संपूर्ण लक्ष ताटावर केंद्रित करून, प्रत्येक पदार्थाची चव घेत, आस्वाद घेत आणि प्रत्येक घासागणिक ईश्वराचे आभार मानित. काम करतांना ती फक्त काम करतात, अगदी मनापासून. त्यांच्या कामावरही प्रेम जडलेलं असतं त्यांचं. आपलं काम उत्कृष्टच झालं पाहिजे असा अट्टहास असतो त्यांचा. आणि जेव्हां ती काहीच करत नाहीत तेव्हां ती काहीच करत नाहीत. तेव्हां ही माणसं निव्वळ आनंद उपभोगतात. प्रत्येक ...

पुस्तक समीक्षा - उधाण वारा

इमेज
नुकतंच तस्लीमा नासरिन यांचं विलास गीते अनुवादित उधाणवारा(उतोल हवा) हे पुस्तक वाचलं. ४५८ पृष्ठांचं हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी २०१० साली प्रकाशित केले आहे. बरेच दिवसांपासून नासरिन यांचं लिखाण वाचायचं होतं पण ते येनकेनकारणे मागे पडत राहिलं. हा त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग. पहिला भाग आहे माझं कुंवारपण(आमार मेयेबेला) . पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की आधी पहिला भाग वाचायला हवा होता. खूप सुंदर शैली आहे वृत्तांत कथनाची, साधी सरळ आणि रोखठोक. अगदी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे स्वत:चं जीवन जगापुढे उलगडून ठेवण्यासाठी, ते सुद्धा अशा प्रदेशात जिथे धर्मव्यवस्था ही इतर सगळ्या व्यवस्थांच्या वरचढ आहे, एक निधडं काळीज लागतं. त्या निडरतेला वारंवार सलाम करावासा वाटत राहतो. पुस्तक हे ज्या भाषेतलं त्या भाषेत वाचण्यात एक वेगळीच मजा असते, तो थेट लेखकाशी साधलेला संवाद असतो, अर्थातच ते नेहमी शक्य नसल्यामुळे अनुवादक आपल्यासाठी देवदूत ठरतात. नासरिन यांचं लिखाण बंगालीमधे आहे आणि त्या सुप्रसिद्ध असल्यामुळे अनुवादाचे तिन्ही पर्याय उपलब्ध होते- मराठी, हिंदी आणि इंग्रजी. अलिकडे अलिकडे खूप सुंदर म...

मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई

इमेज
ताण ताण म्हणजे कुणालातरी काहीतरी सिद्ध करून दाखवण्याचे बंधन, अपेक्षांवर खरे उतरण्याचे बंधन. आपण जर आपल्या गुणदोषांबद्दल साशंक असू तरच हा ताण येईल. आपण जर आपणाला संपूर्णपणे ओळखले असेल तर मग ना अपेक्षा उरतील आणि ना अपेक्षाभंग. अहंकार अहंकार म्हणजे स्वत:ला जगापासून वेगळे समजणे. ताण म्हणा, क्रोध म्हणा की आणखी कोणता विकार म्हणा, सर्वांचे मूळ अहंकारात आहे. जरी व्यावहारिक जगात वावरण्यासाठी, स्वत:चे रक्षण करण्यासाठी हा उपयुक्त आहे परंतु पुढे पुढे हा अहंकार नको तिथे नाक खुपसायला लागतो आणि आपल्या प्रगतीत अडसर ठरतो. कबीर कबीर क्या कहे , जाये गंगा तीर  | एक गोपी के प्रेम मे , बह गये लाख कबीर || मी म्हणजेच तो, तो म्हणजेच मी. मी म्हणजेच गुरू आणि गुरू म्हणजेच मी.  मी गुरूंचा श्रेष्ठ शिष्य आहे, किंवा माझे गुरू सर्वांहून श्रेष्ठ आहे अशी भावना जरी मनात आली की काम बिघडलंच समजा. सत्य सत्य ही खरं तर सांगायची गोष्ट नाही किंवा ती सांगितली जाऊच शकत नाही. सत्य हा एक अनुभव आहे. मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई ज्याप्रमाणे एखाद्या मुक्या माणसाने गूळ खाल्यावर इतरांनी कि...

Kavitecha Paan | Episode 31 | Sonali Kulkarni

इमेज

स्त्री मुक्ती कि स्त्रीत्वा पासुन मुक्ती?

इमेज
सध्या समाजात स्त्री मुक्तीच्या नावाखाली जे काही चालू आहे ते बघता स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय हा प्रश्न परत परत पडायला लागतो? आणि तो पडायला पण हवा. स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडणं कळतं. चुल आणि मुल ही चौकट नाकारणं हे पण कळतं. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊन संसाराला हातभार लावणं पण कळतं. ह्या सगळ्या गोष्टी स्त्री मुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता अंतर्गत ग्राह्य आहेत. सगळ्या गोष्टींचा समतोल राखुन स्त्री जेंव्हा प्रगती करते तेंव्हा त्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी ती अभिमानाची बाब ठरते. सदर लेखाचे प्रयोजन त्या स्त्रियांसाठी आणि कुटुंबासाठी नव्हे. आणि महत्वाचे म्हणजे पुरुष श्रेष्ठीचा पुरस्कार करण्यासाठी तर नव्हेच नव्हे. ते लेख वाचुन तुम्हाला कळेलच. पण हे प्रस्तावनेतच सांगणे गरजेचे आहे जेणेकरून 'त' वरून ताकभात समजुन वाचकांनी लेख वाचायचे टाळू नये. झटपट निवाडा देण्याची मानसिकता या धकाधकीच्या जगात मानवाला मिळालेली देण आहे. असो. स्त्री मुक्ती या सबबीखाली आचरणात येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आता प्रश्नचिन्हे निर्माण करतांना दिसत आहेत. स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय आणि स्त्रीने के...

महती काय वर्णावी प्रेमाचिया !

इमेज
"हमे जबसे मोहोब्बत हो गयी है ये दुनिया खुबसुरत हो गयी है" खरंच, माणुस प्रेमात पडतो तेंव्हा त्याला सगळं चांगलं चांगलं दिसायला लागतं. तो प्रेमाखातर जगायला लागतो, उत्साही बनतो.  प्रत्येक दिवसाचं स्वागत मोठ्या आनंदानं करतो.  रात्र त्याला भारी जाते, प्रत्येक क्षण भरभरून जगण्याची उर्मी त्याला झोपू देत नाही.  कारण झोप म्हणजे त्या प्रिय व्यक्तीचा विसर, जो त्याला मान्य नसतो.  कितीही आळशी माणुस असो प्रेमात पडल्यावर तो लवकर उठायला लागतो.  त्याचं जीवन सकारात्मक उर्जेने भारून जातं.  एखादा कंजुस असलेला माणुस जेंव्हा प्रेमात पडतो तेंव्हा अचानक दान-धर्म करायला लागतो.  आपला एखादा चिक्कु मित्र एकाएकी जेंव्हा खिसा मोकळा करू लागतो तेंव्हा समजुन जावं,  साहेब पडलेत कुठेतरी - प्रेमात.  एकलकोंडा माणुस त्याच्या\तिच्या साथीने हळुहळु माणसात यायला लागतो, मित्र बनवायला शिकतो.  त्याला कळू लागतं कि ही दुनिया किती सुंदर आहे आणि चांगल्या लोकांनी भरलेली आहे.  आपण उगाच इतकी व...

मी संस्कृती बोलते आहे

इमेज
संस्कृतीची सुरकुतलेली वस्त्रे पांघरण्यापेक्षा देवानं दिलेलं यौवन धन दिसु दे कि जगाला. त्यात वावगं काय आहे? उलट पुण्यच लाभेल. हा सुविचार एके दिवशी युवकांच्या एका घोळक्यातुन कानावर आला. मी म्हटलं असेल बाबांनो, तसंही असेल. मला पटो न पटो हा प्रश्नच आता उरला नाही. कारण मी आता म्हातारी झाली आहे, वयानी नाही पण बहुधा विचारांनी. जग खुप पुढे गेलंय, उन्नत झालंय. माझी मात्र या वेगवान युगाशी जुळवुन घेतांना पुरती दमछाक झाली. आता हेच बघा ना सगळे अगदी गांधीजींच्या जीवनशैलीचं मनापासुन अनुकरण करत आहेत. आपण दोन कपडे कमी घातले तर कोण्या गरजु गरीब व्यक्तीला अंगावर घालायला कपडा मिळेल असं म्हणत गांधीजींनी एक वस्त्री पोशाख म्हणजे पंचाचा स्विकार केला होता. आजची युवा पिढी तर गांधीजींच्या दोन पावलं पुढेच आहे, कमी कपडे घालण्यात. एका पंचाच्या कापडात दोघं तिघं अगदी आरामात निभावुन नेतील.  मी माझा पेहराव मोडीत काढु शकले नाही. आणि हो स्त्री-पुरुष समानतेमुळे काय झक्कास प्रगती झाली आहे समाजाची. अगदी काही भेद राहिला नाही. अगदी म्हणजे क्रांतिकारी पिढी आहे बर का आजची.  स्त्री आजकाल केस खुरटे ठेवण्यात धन्य...

प्रेम हे एकतर्फीच असतं

इमेज
प्रेम हे एकतर्फीच असतं, कारण प्रेम हे नेहमी निर्व्याज आणि निस्वार्थी असतं. प्रेमात पडलेला माणुस हा फक्त देतो, देतो आणि देत राहतो. मी इतकं प्रेम करतोय तर समोरच्याने पण माझ्यावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे हा हिशेबी विचार त्याच्या मनात कधीच येत नाही. तराजुत तोलल्या जाणारं ते प्रेम नव्हे.  मी तुझ्यावर प्रेम करतो अशी शाब्दिक व्यक्तता जिथे वारंवार होते तिथे बहुतेक प्रेम निखालस नसावं. कारण  मी तुझ्यावर प्रेम करतो  म्हणणाऱ्या माणसाला समोरच्याकडून  मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो  हे उत्तर अपेक्षित असतं. आणि ते मिळालं नाही कि त्याचा त्याला त्रास होतो. म्हणजे हि फक्त एक प्रकारची  देवाण घेवाण असते. प्रेम ही काही बोलुन सिद्ध करण्याची गोष्ट नाही. सहसा आपल्या कृतीतुन आपण  प्रेमाची व्यक्तता करीत असतो. प्रेमाची प्रचिती, जाणीव हि प्रामुख्याने भावनात्मक पातळीवर असते.  आजकाल प्रेम हा शब्द फार सहज आणि सैल रीत्या वापरल्या जातो. एकेमेकांविषयी शारीरिक आकर्षण आणि विषय वासना दर्शविण्यासाठी हा शब्द लोक बिनधास्त वापरतात त्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ आणि भावार्थ दोन्ही ग...

बेलाची पानं आणि अलुवेरा

इमेज
एकदा तेरवीला एका खेड्यात गेलो होतो. कार्यक्रम आटोपला जेवणं झाली, मग दुपारी अडीचच्या सुमारास परतीस निघालो. चालत बस थांब्यावर आलो. तीन वाजताची बस होती. तिथे झाडाखाली ३-४ बाया आधीच बसल्या होत्या. हळुहळु तिथे गर्दी वाढत गेली. तेरवीला आलेली सगळी वयस्कर माणसं एक एक करून तिथे बसची वाट बघत थांबली. काही लोकांच्या दुचाक्या, फटफट्या होत्या त्यावर ३-३ माणसं बसुन गाव जवळ करू लागली. जास्तीत जास्त लोक आसपासच्या खेड्यावरील होते. शेती कामाचे दिवस. बस आली व पुढच्या गावाला निघुन गेली, जिथुन परतुन ती येणार होती. लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला चला, आता जाणं नक्की. कारण खेडेगावात बस हे मुख्य प्रवासी साधन असलं तरी हमखास येणारच याची खात्री आजच्या तारखेत पण कोणी देऊ शकत नाही. तसं झाल्यास मग ऑटोरिक्षा, ट्रॅॅक्टर, टेम्पो झालंच तर बैलगाडी अशा साधनांचा सहारा. तिकीटांचे दर आकाशाला भिडलेले असले तरी सामान्य माणुस एसटी काही सोडत नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे ह्या ना त्या कारणाने मिळणाऱ्या सवलती. जेष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट, अपंगांना पाव, विद्यार्थ्यांना बस पास वगैरे वगैरे भरपुर सवलती असतात. म्हणुन हे नातं अध...

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद चौथा [रागावणारं मन]

इमेज
पांथ पहिला:   हे ऐका, एका प्रवचनातील वाक्य. क्रोधी और शराबी बिलकुल एक जैसे है. शराबी के कदम डगमगाते है क्रोधी के भी. शराबी बोलना कुछ चाहता है और बोल कुछ जाता है, क्रोधी भी. क्रोध में आदमी ऐसे काम कर देता है जो सिर्फ नशे में हि किये जा सकते है. शराबी होश में आने बाद पछताता है क्रोधी भी. दोनो कहते है फिर कभी न ऐसा न करुंगा लेकिन बार बार वही भुल करते रहते है. तुम्हाला काय वाटतं? पांथ दुसरा: क्रोध, राग. आपल्याला राग का येतो? जर एखादी घटना आपल्या मनाप्रमाणे घडली नाही किंवा कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही तर. पण अगदीच तसे नाही, रस्त्यावरच्या माणसांनी गाडी चुकीची चालवली तरी राग येतो. खर तर जे आत आहे तेच बाहेर येतं. नाहीतर एकाच प्रसंगाला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आल्या नसत्या. रागावणं हे बाहेरच झालं. राग का येतो हे शोधायला पाहिजे. तो आत कुठे आहे ते शोधायला पाहिजे. पांथ पहिला:   हो ना विचित्र आहे रागाचं कोडं. बर क्रोधाचा मुळ अहंकार आहे असं म्हटलं तर मग स्व:ताचा राग का येत असेल. पांथ दुसरा: अहो आपण स्वतः शी बोलतो सुद्धा. तसच स्व:तावर रागावतो. पांथ पहिला:   हो. ...