पोस्ट्स

जुलै, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिचारी 'बुलेट'

'बुलेट' ही रुबाबदार गाडी आठवते का तुम्हाला. तुम्ही म्हणाल, म्हणजे काय ती गाडी काय कोणी विसरू शकेल? खरंय! ही गाडी आधी कधी कधीच रस्त्यावर दिसायची आणी दिसली कि तिच्या दिमाखदार आणि डौलदार रपेटीवरून नजर हटायची नाही. तिचा तो भारदस्तपणा आणि इंजिनच्या फायरिंगची भेदकता तुम्हाला जागेवर खिळवुन ठेवण्यास समर्थ होते. तिच्यावरून रपेट मारणारे स्वार पण आधी तश्याच शरीरयष्टीचे असायचे आणि बुलेट आणि तो स्वार हे एकमेकांना पूरक असल्यामुळे बघणाऱ्यावर एक वेगळीच छाप पडत असे.  पण आजकाल बुलेट चालविणे हि एक फॅशन बनलेली आहे. लोकांकडे बक्कळ पैसा खेळायला लागल्यापासुन उठ सूट कुठल्याही गोष्टीची फॅशन बनायला आता वेळ लागत नाही. आणि त्यामुळेच कधी कधी जे बघाव लागतं ते अगदी विनोदीपासून ते विभत्सपर्यंत काहीही असु शकतं. रस्त्यावरून बुलेट जाणं हि आता नवलाई राहिली नसुन जवळ जवळ डोकेदुखी झालेली आहे. बुलेट बनविऱ्याणे कधी स्वप्नातही विचार केला नसेल कि हि गाडी दररोज कार्यालयात येण्याजाण्यासाठी सुध्दा वापरल्या जाईल. पण आज तुम्ही बघा,  जो नव्हे तो तुम्हाला बुलेट चालवितांना दिसेल. त्यातले अर्धेअधिक चालक तर गाडीला शोभत

समलैंगिकता आणि सामाजिक प्रदुषण

इमेज
समलैंगिकतेस मान्यता न देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याला तीन वर्षे होत आली. अधुन मधुन त्यावर फेरविचार याचिका वगैरे दाखल करण्यात आल्या. आणि ब-याच प्रतिक्रिया प्रकट झाल्या. काही समाधानाच्या काही नाराजीच्या काही भंपकपणाच्या तर काही प्रामाणिक. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता गुन्हा नाही असा निवाडा दिला. यासाठी कि निकालात स्पष्ट म्हटलेलं आहे कि समलैंगिकता नैसर्गिक नाही. यावर आपण फार हुरळुन वगैरे न जाता गंभीर विचार केला पाहिजे.  निसर्गाने जी काम भावना प्राण्यांना दिलेली आहे तिचं मूळ प्रयोजन हे प्रजनन होय जेणेकरून जीवन चक्र या पृथ्वीतलावर अखंडित चालत राहावं. लिंग हे संभोगाचं साधन आहे. लिंगावरून लैंगिकता ठरते. पुरुष लिंग असल्यास निसर्गत: प्राण्याला मादीचं आकर्षण असतं. आणि स्त्री लिंग असल्यास नराचं आकर्षण असतं. जर कुणाला असं विरुद्धलिंगी आकर्षण नसेल किंवा समलिंगी किंवा उभयलिंगी आकर्षण असेल तर त्या व्यक्तीमध्ये तो जैविक, मानसिक अथवा दोन्ही पातळीवरचा दोष आहे असं आपण म्हणू शकतो. हा दोष इतर प्राण्यांत आढळत नाही. आतापर्यंत जे काही संशोधक अभ्यास यावर झाले आहेत त्यांच्याकडे अज