पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेलाची पानं आणि अलुवेरा

इमेज
एकदा तेरवीला एका खेड्यात गेलो होतो. कार्यक्रम आटोपला जेवणं झाली, मग दुपारी अडीचच्या सुमारास परतीस निघालो. चालत बस थांब्यावर आलो. तीन वाजताची बस होती. तिथे झाडाखाली ३-४ बाया आधीच बसल्या होत्या. हळुहळु तिथे गर्दी वाढत गेली. तेरवीला आलेली सगळी वयस्कर माणसं एक एक करून तिथे बसची वाट बघत थांबली. काही लोकांच्या दुचाक्या, फटफट्या होत्या त्यावर ३-३ माणसं बसुन गाव जवळ करू लागली. जास्तीत जास्त लोक आसपासच्या खेड्यावरील होते. शेती कामाचे दिवस. बस आली व पुढच्या गावाला निघुन गेली, जिथुन परतुन ती येणार होती. लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला चला, आता जाणं नक्की. कारण खेडेगावात बस हे मुख्य प्रवासी साधन असलं तरी हमखास येणारच याची खात्री आजच्या तारखेत पण कोणी देऊ शकत नाही. तसं झाल्यास मग ऑटोरिक्षा, ट्रॅॅक्टर, टेम्पो झालंच तर बैलगाडी अशा साधनांचा सहारा. तिकीटांचे दर आकाशाला भिडलेले असले तरी सामान्य माणुस एसटी काही सोडत नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे ह्या ना त्या कारणाने मिळणाऱ्या सवलती. जेष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट, अपंगांना पाव, विद्यार्थ्यांना बस पास वगैरे वगैरे भरपुर सवलती असतात. म्हणुन हे नातं अध