पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण तयार आहोत का?

इमेज
जगाच्या निर्मितीपासूनच सगळा डोलारा अद्यापही निसर्गाने अगदी व्यवस्थित सांभाळला आहे आणि त्यामुळेच उत्क्रांती प्रक्रियेतून मानवाची निर्मिती शक्य झाली. मानवाला कधी कधी ह्या गोष्टीचा विसर पडतो आणि मग त्याला आठवण करून देण्यासाठी निसर्ग आपली खेळी करतो. जगात कोरोना साथीची सुरुवात होऊन जवळ जवळ दहा महिने होत आले. आणि संपूर्ण धोका टळायला दोनेक वर्षे तरी लागतील. त्यानंतर कदाचित मग ही साथ इतिहासात जमा होईल घेतलेल्या बळींच्या संख्येसहीत. अशा महामारीच्या निवारणात घडलेल्या इतिहासातील चुकांमधून आपण काही शिकलो आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे.  गेल्या तीनशे वर्षात विज्ञान क्षेत्रात झालेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेता आपण मानवजातीने एव्हाना अशा संकटांसाठी तयार असायला हवे होते, पण तसे होत नसते. प्रगतीचे परिणाम हे सर्वंकष असतात, त्याची फक्त उजवी बाजू लक्षात घेऊन स्वत:ची पाठ थोपटत राहिल्यास, एक डोळ्यांनी न दिसू शकणारा विषाणूसम जीव देखील तुम्हाला नामोहरम करून तुमची पायरी दाखवून देऊ शकतो. कोरोना महामारीच्या फैलावात चीनचा सहभाग हा आंतराष्ट्रीय अन्वेषणाचा विषय आहे म्हणून सध्यातरी आपण ही साथ काला

एक छोटीशी पुडी

इमेज
एक छोटीशी पुडी. परंतु या पुडीची मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती मात्र महान आहे. खरं तर लोकांच्या खिशात ही पुडी असते, तरी करोडो लोकांना या पुडीने खिशात घातले आहे. मी कशाबद्दल बोलतोय ह्याची कल्पना एव्हाना तुम्हाला आलीच असेल. होय मी बोलतो आहे त्या गुटख्याच्या पुडीबद्दल. तीच गुटख्याची पुडी जिने गेली काही दशके सामान्य जनतेच्या मनावर राज्य केले आहे. तीच पुडी जिच्या कारनाम्यांनी तद्दन उशीरा का होईना परंतु सरकारांना जाग आली आणि त्यांनी पुडीवर निर्बंध घातले. ह्या पुडीने भारताची बऱ्यापैकी युवाशक्ती गिळून टाकली आहे. जास्त प्रभाव हा ग्रामीण युवकांवर दिसून येतो. काम असो नसो, गावातील ठरलेल्या मोक्याच्या ठिकाणी या युवकांचे टोळके जमते आणि सर्वात मुख्य आकर्षण असते गुटख्याच्या पुड्या. एक पुडी फोडून अर्धी अर्धी खाल्ली म्हणजे जणू काही शोलेच्या जय-वीरूची मैत्री आहे ह्या आवेशात ही युवा मंडळी वावरतअसते. रोज दोन-तीन रुपयांची पुडी खाणाऱ्याला जर कुणी ५-१० रुपयाला मिळणारी उच्चवर्गीय गुटखा पुडी देऊ केली की त्याला स्वर्ग ठेंगणा होतो. जणू दररोज देशी ढोसणाऱ्या दारुड्याला कुणी इंग्रजी स्कॉचची बाटली भेट द्यावी. सकाळी

मनाचा कळफलक

इमेज
बरेचदा आपण आपल्याही नकळत उदास होऊन जातो. किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर आपली चिडचिड व्हायला लागते. कारण कळत नाही.  किंवा असे म्हणू की त्यावेळी आपण कारण शोधत बसत नाही. आपण फक्त होणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होत राहतो, प्रतिक्रिया देत राहतो. कधी कधी घरी दूरचित्रवाणीसमोर बसून बातम्या किंवा एखादा कार्यक्रम बघत असतांना मुलांचा गोंधळ चालू होतो. त्यामुळे आपल्याला ऐकण्यात अडथळा येतो. मग हळूहळू चिडचिड व्हायला लागते. असं जर दोन-तीनदा झालं तर आपण मुलांवर ओरडतो किंवा खेकसतोसुद्धा. कधी कधी तर पाठीत दोन धपाटे पण घालून देतो. काही वेळाने किंवा दिवसाअखेरी आपल्याला आपल्या कृतीचं वाईट वाटतं. आपण उगाच रागावलो असं वाटतं आणि तेच बरोबर असतं. हे क्वचित होत असेल तर हरकत नाही. कधी कधी अशी प्रतिक्रिया मुलांना काही बाबतीत मर्यादा घालून देण्यास उपयुक्त ठरते. परंतु हे चित्र जर तुमच्या घरात वारंवार उद्भवत असेल तर मात्र अवलोकन करणे गरजेचे आहे. आपण मनोरंजनासाठी दूरचित्रवाणीसमोर बसतो, कधी कधी सवयीने बसता. परंतु ही क्रिया वरवरची असते. आपल्या मनात मात्र वेगळे विचार, काही प्रश्न किंवा एखाद्या चिंतेचा भुंगा सारखा भुणभुणत असतो.