पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अज्ञाताचा शोध संवादमाला

माणसाच्या आयुष्यात कधी तरी अशी अवस्था येते जेंव्हा त्याला कशाचा तरी शोध खुणावु लागतो. पण कशाचा? ती वस्तु आहे कि फक्त अनुभुती. ह्या जगातील आहे कि परलोकीय? या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला कितीतरी प्रश्न भेडसावत असतात. अशाच दोन पांथांमधील ह्या शोधाच्या वाटेवर उलगडत घडणारे हे संवाद आपण या सदरातुन बघणार आहोत.  संवाद पहिला पहिला पांथ: मी खरंच कशाच्या शोधात आहे? देवाच्या? लहानपणापासुन देवाबद्दल ऐकलय पण त्या संकल्पनेचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही. ह्याचा काय अर्थ काढायचा? देवाबद्दल माझी जी काही थोडीफार समज किंवा धारणा आहे त्याला सुसंगत असं काही ऐकायला मिळालं तर तिकडं मन आकर्षित होतं? पण मी या मार्गावर का आहे? मी काय शोधत आहे? दुसरा पांथ: माणुस हा एकच असा प्राणी आहे पृथ्वीवर ज्याच्या अंतरात अज्ञाताचा वेध घेण्याची हि ओढ आहे. आणि प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न उठणं अगदी स्वाभाविक आहे. फक्त कोणाच्या मनात ते थोडे लवकर उठायला लागतात तर कोणाच्या मनात उशीरा. पण हे लवकर उशिरा ह्या आयुष्याच्या नव्हे तर आत्म्याच्या प्रवासाच्या संदर्भात आहे. मला माहित आहे मी आणखी एक गुढ शब्द वापरतोय 'आत्मा'.

अंधानुकरणाचा (भि)कारनामा

इमेज
गरज नसतांना वापरल्या जाणाऱ्या वस्तुंचा किंवा सुविधांचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होत असतो. हे कळत असले तरी वळत बऱ्याच लोकांना नाही. कोणत्याही गावाचा किंवा शहराचा विकास होत असतांना काही गोष्टी घडत जातात जसे कि रस्ते रुंद होणे, त्यावर दिवे लागणे, सुशोभीकरण, मोठाली दुकानं उघडणे, एकंदरीत सगळीकडे झगमगाट दृष्टीस पडायला लागतो. विकास आणि अर्थव्यवस्था यांचं जवळचं नातं आहे. लोकांची क्रय शक्ती वाढली कि बाजारपेठ मोठी होते आणि त्याला अनुसरून शहराचा ही विकास होत राहतो. शहरात जाहिराती वाढायला लागतात ज्यात लोकांसाठी वेगवेगळी प्रलोभनं असतात. एकावर एक मोफत, २५ टक्के अधिक, १००० रुपयांच्या खरेदीवर एक भेटवस्तु वगैरे वगैरे. आणि लोक ह्या ना त्या प्रकारे प्रलोभनांना बळी पडतातच. वर्षानुवर्षे वापरलेली स्थानिक उत्पादनं सोडुन नामांकित कंपन्यांची उत्पादनं वापरायला सुरु करतात. सोयी सुविधा विकत घेऊन बदल्यात स्वस्थ जीवनशैलीचा परिहार करतात. मी पण माझ्या शहरात होणारी हि स्थित्यंतरं बघितली आणि अनुभवली आहे. ह्या काळात माणसांमध्ये होणारी मनोस्थित्यंतरं तर खुपच बोलकी, आश्चर्यास्पद आणि कधी कधी अंतर्मुख करणारी असतात. महानग