पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं

इमेज
इतकंही सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं. हो म्हणजे खरंच काही मौलिक लिहायचं म्हटलं तर ते सोपं नसतं. नुसती दिनचर्या खरडून काढण्यात काही अर्थ नसतो. तर प्रत्येक दिवशी तुम्ही जे जगलात ते अगदी प्रामाणिकपणे ह्या पानावर उतरवणं सोपं नसतं. त्यासाठी तयारी लागते बऱ्याच गोष्टींची. एकतर माणसाने खरच जगायला हवं, ही पहिली गोष्ट. कारण येणारा दिवस कसाबसा ढकलून लावत, रहाटगाडग्यात अडकलेल्या पोहऱ्याप्रमाणं जगण्याला जर कुणी जगणं म्हणत असेल तर त्या माणसाला जीवन अजून कळालेलंच नाही. त्याच्या जगण्याची अजून सुरुवातच झाली नाही. होणारही नाही कदाचित, आयुष्य असंच निघून जाईल. माणसं तीच जगतात जी प्रत्येक क्षणाची साक्षी असतात. जेवतांना ती फक्त जेवतात, संपूर्ण लक्ष ताटावर केंद्रित करून, प्रत्येक पदार्थाची चव घेत, आस्वाद घेत आणि प्रत्येक घासागणिक ईश्वराचे आभार मानित. काम करतांना ती फक्त काम करतात, अगदी मनापासून. त्यांच्या कामावरही प्रेम जडलेलं असतं त्यांचं. आपलं काम उत्कृष्टच झालं पाहिजे असा अट्टहास असतो त्यांचा. आणि जेव्हां ती काहीच करत नाहीत तेव्हां ती काहीच करत नाहीत. तेव्हां ही माणसं निव्वळ आनंद उपभोगतात. प्रत्येक

पुस्तक समीक्षा - उधाण वारा

इमेज
नुकतंच तस्लीमा नासरिन यांचं विलास गीते अनुवादित उधाणवारा(उतोल हवा) हे पुस्तक वाचलं. ४५८ पृष्ठांचं हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी २०१० साली प्रकाशित केले आहे. बरेच दिवसांपासून नासरिन यांचं लिखाण वाचायचं होतं पण ते येनकेनकारणे मागे पडत राहिलं. हा त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग. पहिला भाग आहे माझं कुंवारपण(आमार मेयेबेला) . पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की आधी पहिला भाग वाचायला हवा होता. खूप सुंदर शैली आहे वृत्तांत कथनाची, साधी सरळ आणि रोखठोक. अगदी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे स्वत:चं जीवन जगापुढे उलगडून ठेवण्यासाठी, ते सुद्धा अशा प्रदेशात जिथे धर्मव्यवस्था ही इतर सगळ्या व्यवस्थांच्या वरचढ आहे, एक निधडं काळीज लागतं. त्या निडरतेला वारंवार सलाम करावासा वाटत राहतो. पुस्तक हे ज्या भाषेतलं त्या भाषेत वाचण्यात एक वेगळीच मजा असते, तो थेट लेखकाशी साधलेला संवाद असतो, अर्थातच ते नेहमी शक्य नसल्यामुळे अनुवादक आपल्यासाठी देवदूत ठरतात. नासरिन यांचं लिखाण बंगालीमधे आहे आणि त्या सुप्रसिद्ध असल्यामुळे अनुवादाचे तिन्ही पर्याय उपलब्ध होते- मराठी, हिंदी आणि इंग्रजी. अलिकडे अलिकडे खूप सुंदर म