पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अज्ञाताचा शोध संवादमाला

माणसाच्या आयुष्यात कधी तरी अशी अवस्था येते जेंव्हा त्याला कशाचा तरी शोध खुणावु लागतो. पण कशाचा? ती वस्तु आहे कि फक्त अनुभुती. ह्या जगातील आहे कि परलोकीय? या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला कितीतरी प्रश्न भेडसावत असतात. अशाच दोन पांथांमधील ह्या शोधाच्या वाटेवर उलगडत घडणारे हे संवाद आपण या सदरातुन बघणार आहोत.  संवाद पहिला पहिला पांथ: मी खरंच कशाच्या शोधात आहे? देवाच्या? लहानपणापासुन देवाबद्दल ऐकलय पण त्या संकल्पनेचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही. ह्याचा काय अर्थ काढायचा? देवाबद्दल माझी जी काही थोडीफार समज किंवा धारणा आहे त्याला सुसंगत असं काही ऐकायला मिळालं तर तिकडं मन आकर्षित होतं? पण मी या मार्गावर का आहे? मी काय शोधत आहे? दुसरा पांथ: माणुस हा एकच असा प्राणी आहे पृथ्वीवर ज्याच्या अंतरात अज्ञाताचा वेध घेण्याची हि ओढ आहे. आणि प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न उठणं अगदी स्वाभाविक आहे. फक्त कोणाच्या मनात ते थोडे लवकर उठायला लागतात तर कोणाच्या मनात उशीरा. पण हे लवकर उशिरा ह्या आयुष्याच्या नव्हे तर आत्म्याच्या प्रवासाच्या संदर्भात आहे. मला माहित आहे मी आणखी एक गुढ शब्द वापरतोय 'आत्मा'.

अंधानुकरणाचा (भि)कारनामा

इमेज
गरज नसतांना वापरल्या जाणाऱ्या वस्तुंचा किंवा सुविधांचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होत असतो. हे कळत असले तरी वळत बऱ्याच लोकांना नाही. कोणत्याही गावाचा किंवा शहराचा विकास होत असतांना काही गोष्टी घडत जातात जसे कि रस्ते रुंद होणे, त्यावर दिवे लागणे, सुशोभीकरण, मोठाली दुकानं उघडणे, एकंदरीत सगळीकडे झगमगाट दृष्टीस पडायला लागतो. विकास आणि अर्थव्यवस्था यांचं जवळचं नातं आहे. लोकांची क्रय शक्ती वाढली कि बाजारपेठ मोठी होते आणि त्याला अनुसरून शहराचा ही विकास होत राहतो. शहरात जाहिराती वाढायला लागतात ज्यात लोकांसाठी वेगवेगळी प्रलोभनं असतात. एकावर एक मोफत, २५ टक्के अधिक, १००० रुपयांच्या खरेदीवर एक भेटवस्तु वगैरे वगैरे. आणि लोक ह्या ना त्या प्रकारे प्रलोभनांना बळी पडतातच. वर्षानुवर्षे वापरलेली स्थानिक उत्पादनं सोडुन नामांकित कंपन्यांची उत्पादनं वापरायला सुरु करतात. सोयी सुविधा विकत घेऊन बदल्यात स्वस्थ जीवनशैलीचा परिहार करतात. मी पण माझ्या शहरात होणारी हि स्थित्यंतरं बघितली आणि अनुभवली आहे. ह्या काळात माणसांमध्ये होणारी मनोस्थित्यंतरं तर खुपच बोलकी, आश्चर्यास्पद आणि कधी कधी अंतर्मुख करणारी असतात. महानग

जीवन कि अगरबत्ती

इमेज
इस संसार कि हर चीज हमे कुछ ना कुछ सिखाती है. हमे सिर्फ चाहिए एक खोजी नज़र. चलो देखे एक अगरबत्ती हमे क्या बता रही है: अतीत है राख, अब वहां खुशबु कि गुंजाईश नही भविष्य है अज्ञात अंधकार, जहां रोशनी अभी पहुंची नही वर्तमान है  जिवंत, जलता पल, संभावनाओ से ओतप्रोत अतीत का दामन पकड के रखोगे तो जीवन मे सिर्फ राख के हकदार बनोगे भविष्य कि चिंता और तयारी में मशगुल रहोगे तो अंधकार में जीवन बीत जायेगा   वर्तमान में जीनेवाला व्यक्ती हि केवल जीवन कि खुशबु का हकदार होता है

चुरगाळलेले पुस्तक

मागच्या आठवड्यात रेल्वे प्रवासात होतो, पुण्याहुन अमरावतीला जात होतो. सर्व प्रवाशी स्थिर स्थावर झाले, आपापल्या कोशात घुसले किंवा घुसण्याच्या प्रयत्नात होते. मी पण तसाच आहे, एकतर पुस्तक वाचत बसायचं किंवा खिडकीतुन बाहेर बघत बसायचं.  सहसा मी लगेच मिसळत किंवा बोलत नाही. पण यावेळी माझ्याकडे पुस्तक पण नव्हते आणि खिडकी पण दुर होती. बाजुच्या माणसाची थोडी विचारपुस चर्चा केली व मग नंतर शांत बसुन लोकांना न्याहाळत होतो. एक सहप्रवाशी गृहस्थ होते, त्यांनी एक पुस्तक बाहेर काढले, बहुदा त्यांना पण वाचनाची आवड असावी. आणि त्यांनी चष्मा वगैरे लावुन पुस्तक वाचायला सुरु केले. मी पण एक पुस्तक वेडा असल्यामुळे, वाचणाऱ्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. पण त्या पुस्तकाकडे बघुन मात्र मी गोंधळुन गेलो. पुस्तकाची अवस्था वाईट होती. अगदी चुरगाळलेल्या अवस्थेत दिसत होतं. ठिकठिकाणी पानं दुमडलेली होती. विचार केला हि अवस्था का झाली असावी, अनावधानाने पिशवीत कोंबल्या गेलं असेल का? पण मग पानं का दुमडली आहेत? साठीतले छान इस्त्री केलेला सदरा विजार घातलेले ते गृहस्थ मन लावुन पुस्तक वाचत होते. मला वाटलं त्यांच्या घरी नक्कीच कोणीतरी

चित्रपट समीक्षा - 'सैराट'

इमेज
मी सैराट बराच उशीरा म्हणजे आत्ता बघितला. काही ना काही कारणास्तव तो बघायचा राहूनच गेला. आणि ह्या सहा महिन्यात दूरचित्रवाणी वर त्याच्या गाण्यांची आणि दृश्यांची इतकी उजळणी होऊन चुकली होती कि वाटलं होतं आता आणखी काही उरलं असेल का बघायला. पण बघायला मजा आली. दिग्दर्शन, संवाद लेखन आणि पात्रांची निवड यामध्ये चित्रपट पुर्ण गुण मिळवुन जातो. कथा छोटी आणि यापुर्वी बरेचदा सांगितल्या गेलेली आणि बघितल्या गेलेली. त्यामुळे इतर बाजुंवर दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतली हे दिसुन येतं. अजय अतुल यांनी परत एकदा जादु दाखवली आणि चित्रपटाला संगीत चित्रपट हा दर्जा लाभला. फँड्री नंतर त्याच कथेतला एक दुवा पकडुन अत्यंत सफल रीत्या हि प्रेम कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात नागराज मंजुळे यांना यश आलं आहे. रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी पदार्पणात केलेल्या कामगिरीची कमाल वाटत राहते. उत्तरार्धात मात्र चित्रपट थोडा भरकटल्या सारखा झालाय. कथेत जरी नाही तरी दिग्दर्शनात नक्कीच. आणि त्याचमुळे उत्तरार्ध लहान असुनही थोडा रेंगाळलेला वाटतो. परश्या आणि आर्चीचा वास्तवाशी सामना आणि अस्तित्वासाठी संघर्ष उलगडुन

अणे आणि चणे

इमेज
एक होता अणे  मोठा साहेब होता म्हणे त्याची बुद्धी फिरली आता धंदा करतो म्हणे नोकरी दिली सोडुन गावी परत आला चौकाचौकात फिरून चणे विकु लागला चणे घ्या चणे चाराण्याचे चणे छान छान चणे विदर्भाचे चणे चणे कोणी घेईना अण्याला भाव देईना अणे झाला खट्टु लागला हात पाय आपटु अण्याने लढविली अक्कल त्याला सुचली शक्कल घेऊन गेला चणे फोडुन आणले फुटाणे फुटाणे घ्या फुटाणे चाराण्याचे फुटाणे छान छान फुटाणे विदर्भाचे फुटाणे फुटाणे कोणी घेईना अण्याला भाव देईना अण्याची झाली फजिती लपु कुठे अन लपु किती अण्याच्या आले लक्षात गाजराने आपला केला घात मुंबई गेली पुणेही गेले हाती केवळ धुपाटणे आले ओरडुन ओरडुन थकला अणे  खाऊन टाकले सगळे फुटाणे

पुस्तक समीक्षा - पडघम [रवींद्र शोभणे]

इमेज
प्रकाशन: मॅजेस्टिक                                  पृष्ठसंख्या: ६८२                                     किंमत: ४५० रु. महिन्याभरापूर्वी लेखक रवींद्र शोभणे यांची 'पडघम' हि कादंबरी हाती लागली. चांगले भारी भरकम ६८० पानांचे हे लिखाण आहे. वाचनालयातुन आणतांना थोडी चाळली तर बरी वाटली.  कॉंग्रेस, आणीबाणी, इंदिरा गांधी, जनता दलाचा उदय आणि अस्त अशा राजकिय अंगाने जाणारी ती वाटली. एवढे मोठे पुस्तक वाचुन काढणे म्हणजे वेळेचं नियोजन आलं. मी जिद्दीने ती वाचायला सुरु केली. परंतु ३०-४० पानं संपता संपता खरे स्वरूप समोर आले. तिचा मुळ गाभा दलित विरुध्द ब्राम्हण संघर्ष असुन तो प्रभावी बनविण्यासाठी तत्कालीन राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि नाते संबंधातील गुंतागुंत या गोष्टींचा आधार घेतला आहे. असे नसल्यास मग लेखकाचा उद्देश्य वाचकापर्यंत स्पष्ट पोहोचलेला नाही हे नक्की समजावे. हि एक राजकीय कादंबरी नक्कीच नाही त्यामुळे ज्यांना खरेच राजकारणातील इतिहासाची आवड आहे त्यांनी हिच्या वाटेला जाऊ नये, निराशा हाती लागेल. स्वातंत्र्या नंतरच्या राजकिय पटलावर आधारीत बरीच इतर चांगली पुस्तके सापडतात. पात