पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Kavitecha Paan | Episode 31 | Sonali Kulkarni

इमेज

स्त्री मुक्ती कि स्त्रीत्वा पासुन मुक्ती?

इमेज
सध्या समाजात स्त्री मुक्तीच्या नावाखाली जे काही चालू आहे ते बघता स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय हा प्रश्न परत परत पडायला लागतो? आणि तो पडायला पण हवा. स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडणं कळतं. चुल आणि मुल ही चौकट नाकारणं हे पण कळतं. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊन संसाराला हातभार लावणं पण कळतं. ह्या सगळ्या गोष्टी स्त्री मुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता अंतर्गत ग्राह्य आहेत. सगळ्या गोष्टींचा समतोल राखुन स्त्री जेंव्हा प्रगती करते तेंव्हा त्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी ती अभिमानाची बाब ठरते. सदर लेखाचे प्रयोजन त्या स्त्रियांसाठी आणि कुटुंबासाठी नव्हे. आणि महत्वाचे म्हणजे पुरुष श्रेष्ठीचा पुरस्कार करण्यासाठी तर नव्हेच नव्हे. ते लेख वाचुन तुम्हाला कळेलच. पण हे प्रस्तावनेतच सांगणे गरजेचे आहे जेणेकरून 'त' वरून ताकभात समजुन वाचकांनी लेख वाचायचे टाळू नये. झटपट निवाडा देण्याची मानसिकता या धकाधकीच्या जगात मानवाला मिळालेली देण आहे. असो. स्त्री मुक्ती या सबबीखाली आचरणात येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आता प्रश्नचिन्हे निर्माण करतांना दिसत आहेत. स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय आणि स्त्रीने के

महती काय वर्णावी प्रेमाचिया !

इमेज
"हमे जबसे मोहोब्बत हो गयी है ये दुनिया खुबसुरत हो गयी है" खरंच, माणुस प्रेमात पडतो तेंव्हा त्याला सगळं चांगलं चांगलं दिसायला लागतं. तो प्रेमाखातर जगायला लागतो, उत्साही बनतो.  प्रत्येक दिवसाचं स्वागत मोठ्या आनंदानं करतो.  रात्र त्याला भारी जाते, प्रत्येक क्षण भरभरून जगण्याची उर्मी त्याला झोपू देत नाही.  कारण झोप म्हणजे त्या प्रिय व्यक्तीचा विसर, जो त्याला मान्य नसतो.  कितीही आळशी माणुस असो प्रेमात पडल्यावर तो लवकर उठायला लागतो.  त्याचं जीवन सकारात्मक उर्जेने भारून जातं.  एखादा कंजुस असलेला माणुस जेंव्हा प्रेमात पडतो तेंव्हा अचानक दान-धर्म करायला लागतो.  आपला एखादा चिक्कु मित्र एकाएकी जेंव्हा खिसा मोकळा करू लागतो तेंव्हा समजुन जावं,  साहेब पडलेत कुठेतरी - प्रेमात.  एकलकोंडा माणुस त्याच्या\तिच्या साथीने हळुहळु माणसात यायला लागतो, मित्र बनवायला शिकतो.  त्याला कळू लागतं कि ही दुनिया किती सुंदर आहे आणि चांगल्या लोकांनी भरलेली आहे.  आपण उगाच इतकी वर्षे आपल्या कोषात घालविली.  कि

मी संस्कृती बोलते आहे

इमेज
संस्कृतीची सुरकुतलेली वस्त्रे पांघरण्यापेक्षा देवानं दिलेलं यौवन धन दिसु दे कि जगाला. त्यात वावगं काय आहे? उलट पुण्यच लाभेल. हा सुविचार एके दिवशी युवकांच्या एका घोळक्यातुन कानावर आला. मी म्हटलं असेल बाबांनो, तसंही असेल. मला पटो न पटो हा प्रश्नच आता उरला नाही. कारण मी आता म्हातारी झाली आहे, वयानी नाही पण बहुधा विचारांनी. जग खुप पुढे गेलंय, उन्नत झालंय. माझी मात्र या वेगवान युगाशी जुळवुन घेतांना पुरती दमछाक झाली. आता हेच बघा ना सगळे अगदी गांधीजींच्या जीवनशैलीचं मनापासुन अनुकरण करत आहेत. आपण दोन कपडे कमी घातले तर कोण्या गरजु गरीब व्यक्तीला अंगावर घालायला कपडा मिळेल असं म्हणत गांधीजींनी एक वस्त्री पोशाख म्हणजे पंचाचा स्विकार केला होता. आजची युवा पिढी तर गांधीजींच्या दोन पावलं पुढेच आहे, कमी कपडे घालण्यात. एका पंचाच्या कापडात दोघं तिघं अगदी आरामात निभावुन नेतील.  मी माझा पेहराव मोडीत काढु शकले नाही. आणि हो स्त्री-पुरुष समानतेमुळे काय झक्कास प्रगती झाली आहे समाजाची. अगदी काही भेद राहिला नाही. अगदी म्हणजे क्रांतिकारी पिढी आहे बर का आजची.  स्त्री आजकाल केस खुरटे ठेवण्यात धन्यता मानते

प्रेम हे एकतर्फीच असतं

इमेज
प्रेम हे एकतर्फीच असतं, कारण प्रेम हे नेहमी निर्व्याज आणि निस्वार्थी असतं. प्रेमात पडलेला माणुस हा फक्त देतो, देतो आणि देत राहतो. मी इतकं प्रेम करतोय तर समोरच्याने पण माझ्यावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे हा हिशेबी विचार त्याच्या मनात कधीच येत नाही. तराजुत तोलल्या जाणारं ते प्रेम नव्हे.  मी तुझ्यावर प्रेम करतो अशी शाब्दिक व्यक्तता जिथे वारंवार होते तिथे बहुतेक प्रेम निखालस नसावं. कारण  मी तुझ्यावर प्रेम करतो  म्हणणाऱ्या माणसाला समोरच्याकडून  मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो  हे उत्तर अपेक्षित असतं. आणि ते मिळालं नाही कि त्याचा त्याला त्रास होतो. म्हणजे हि फक्त एक प्रकारची  देवाण घेवाण असते. प्रेम ही काही बोलुन सिद्ध करण्याची गोष्ट नाही. सहसा आपल्या कृतीतुन आपण  प्रेमाची व्यक्तता करीत असतो. प्रेमाची प्रचिती, जाणीव हि प्रामुख्याने भावनात्मक पातळीवर असते.  आजकाल प्रेम हा शब्द फार सहज आणि सैल रीत्या वापरल्या जातो. एकेमेकांविषयी शारीरिक आकर्षण आणि विषय वासना दर्शविण्यासाठी हा शब्द लोक बिनधास्त वापरतात त्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ आणि भावार्थ दोन्ही गढुळ झाले आहेत. कोणी तरी माझ्यावर प्रेम