पोस्ट्स

सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं

इमेज
इतकंही सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं. हो म्हणजे खरंच काही मौलिक लिहायचं म्हटलं तर ते सोपं नसतं. नुसती दिनचर्या खरडून काढण्यात काही अर्थ नसतो. तर प्रत्येक दिवशी तुम्ही जे जगलात ते अगदी प्रामाणिकपणे ह्या पानावर उतरवणं सोपं नसतं. त्यासाठी तयारी लागते बऱ्याच गोष्टींची. एकतर माणसाने खरच जगायला हवं, ही पहिली गोष्ट. कारण येणारा दिवस कसाबसा ढकलून लावत, रहाटगाडग्यात अडकलेल्या पोहऱ्याप्रमाणं जगण्याला जर कुणी जगणं म्हणत असेल तर त्या माणसाला जीवन अजून कळालेलंच नाही. त्याच्या जगण्याची अजून सुरुवातच झाली नाही. होणारही नाही कदाचित, आयुष्य असंच निघून जाईल.

माणसं तीच जगतात जी प्रत्येक क्षणाची साक्षी असतात. जेवतांना ती फक्त जेवतात, संपूर्ण लक्ष ताटावर केंद्रित करून, प्रत्येक पदार्थाची चव घेत, आस्वाद घेत आणि प्रत्येक घासागणिक ईश्वराचे आभार मानित.

काम करतांना ती फक्त काम करतात, अगदी मनापासून. त्यांच्या कामावरही प्रेम जडलेलं असतं त्यांचं. आपलं काम उत्कृष्टच झालं पाहिजे असा अट्टहास असतो त्यांचा.

आणि जेव्हां ती काहीच करत नाहीत तेव्हां ती काहीच करत नाहीत. तेव्हां ही माणसं निव्वळ आनंद उपभोगतात. प्रत्येक क्षणाचं …

पुस्तक समीक्षा - उधाण वारा

इमेज
नुकतंच तस्लीमा नासरिन यांचं विलास गीते अनुवादित उधाणवारा(उतोल हवा) हे पुस्तक वाचलं. ४५८ पृष्ठांचं हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी २०१० साली प्रकाशित केले आहे. बरेच दिवसांपासून नासरिन यांचं लिखाण वाचायचं होतं पण ते येनकेनकारणे मागे पडत राहिलं. हा त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग. पहिला भाग आहे माझं कुंवारपण(आमार मेयेबेला). पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की आधी पहिला भाग वाचायला हवा होता. खूप सुंदर शैली आहे वृत्तांत कथनाची, साधी सरळ आणि रोखठोक. अगदी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे स्वत:चं जीवन जगापुढे उलगडून ठेवण्यासाठी, ते सुद्धा अशा प्रदेशात जिथे धर्मव्यवस्था ही इतर सगळ्या व्यवस्थांच्या वरचढ आहे, एक निधडं काळीज लागतं. त्या निडरतेला वारंवार सलाम करावासा वाटत राहतो.


पुस्तक हे ज्या भाषेतलं त्या भाषेत वाचण्यात एक वेगळीच मजा असते, तो थेट लेखकाशी साधलेला संवाद असतो, अर्थातच ते नेहमी शक्य नसल्यामुळे अनुवादक आपल्यासाठी देवदूत ठरतात. नासरिन यांचं लिखाण बंगालीमधे आहे आणि त्या सुप्रसिद्ध असल्यामुळे अनुवादाचे तिन्ही पर्याय उपलब्ध होते- मराठी, हिंदी आणि इंग्रजी. अलिकडे अलिकडे खूप सुंदर मराठी अन…

मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई

इमेज
ताण
ताण म्हणजे कुणालातरी काहीतरी सिद्ध करून दाखवण्याचे बंधन, अपेक्षांवर खरे उतरण्याचे बंधन.
आपण जर आपल्या गुणदोषांबद्दल साशंक असू तरच हा ताण येईल. आपण जर आपणाला संपूर्णपणे ओळखले असेल तर मग ना अपेक्षा उरतील आणि ना अपेक्षाभंग.


अहंकार
अहंकार म्हणजे स्वत:ला जगापासून वेगळे समजणे. ताण म्हणा, क्रोध म्हणा कि आणखी कोणता विकार म्हणा, सर्वांचे मूळ अहंकारात आहे. जरी व्यावहारिक जगात वावरण्यासाठी, स्वत:चे रक्षण करण्यासाठी हा उपयुक्त आहे परंतु पुढे पुढे हा अहंकार नको तिथे नाक खुपसायला लागतो आणि आपल्या प्रगतीत अडसर ठरतो.

कबीर कबीर क्या कहे | जाये गंगा तीर
एक गोपी के प्रेम मे | बह गये लाख कबीर

मी म्हणजेच तो, तो म्हणजेच मी. मी म्हणजेच गुरू आणि गुरू म्हणजेच मी. मी गुरुंचा श्रेष्ठ शिष्य आहे, किंवा माझे गुरु सर्वांहून श्रेष्ठ आहे अशी भावना जरी मनात आली की काम बिघडलं समजा.


सत्य
सत्य हि खरं तर सांगायची गोष्ट नाही किंवा ती सांगितली जाऊच शकत नाही. सत्य हा एक अनुभव आहे.

मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई

ज्याप्रमाणे एखाद्या मुक्या माणसाने गूळ खाल्यावर इतरांनी कितीही विचारलं तरी तो त्याचा अनुभव कथन करू शकत नाही. प्र…

Kavitecha Paan | Episode 31 | Sonali Kulkarni

इमेज

स्त्री मुक्ती कि स्त्रीत्वा पासुन मुक्ती?

इमेज
सध्या समाजात स्त्री मुक्तीच्या नावाखाली जे काही चालू आहे ते बघता स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय हा प्रश्न परत परत पडायला लागतो? आणि तो पडायला पण हवा. स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडणं कळतं. चुल आणि मुल ही चौकट नाकारणं हे पण कळतं. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊन संसाराला हातभार लावणं पण कळतं. ह्या सगळ्या गोष्टी स्त्री मुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता अंतर्गत ग्राह्य आहेत. सगळ्या गोष्टींचा समतोल राखुन स्त्री जेंव्हा प्रगती करते तेंव्हा त्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी ती अभिमानाची बाब ठरते. सदर लेखाचे प्रयोजन त्या स्त्रियांसाठी आणि कुटुंबासाठी नव्हे. आणि महत्वाचे म्हणजे पुरुष श्रेष्ठीचा पुरस्कार करण्यासाठी तर नव्हेच नव्हे. ते लेख वाचुन तुम्हाला कळेलच. पण हे प्रस्तावनेतच सांगणे गरजेचे आहे जेणेकरून 'त' वरून ताकभात समजुन वाचकांनी लेख वाचायचे टाळू नये. झटपट निवाडा देण्याची मानसिकता या धकाधकीच्या जगात मानवाला मिळालेली देण आहे. असो.

स्त्री मुक्ती या सबबीखाली आचरणात येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आता प्रश्नचिन्हे निर्माण करतांना दिसत आहेत. स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय आणि स्त्रीने केलेल…

महती काय वर्णावी प्रेमाचिया !

इमेज
"हमे जबसे मोहोब्बत हो गयी है ये दुनिया खुबसुरत हो गयी है"
खरंच, माणुस प्रेमात पडतो तेंव्हा त्याला सगळं चांगलं चांगलं दिसायला लागतं. तो प्रेमाखातर जगायला लागतो, उत्साही बनतो.  प्रत्येक दिवसाचं स्वागत मोठ्या आनंदानं करतो. 
रात्र त्याला भारी जाते, प्रत्येक क्षण भरभरून जगण्याची उर्मी त्याला झोपू देत नाही.  कारण झोप म्हणजे त्या प्रिय व्यक्तीचा विसर, जो त्याला मान्य नसतो. 

कितीही आळशी माणुस असो प्रेमात पडल्यावर तो लवकर उठायला लागतो.  त्याचं जीवन सकारात्मक उर्जेने भारून जातं. 

एखादा कंजुस असलेला माणुस जेंव्हा प्रेमात पडतो तेंव्हा अचानक दान-धर्म करायला लागतो.  आपला एखादा चिक्कु मित्र एकाएकी जेंव्हा खिसा मोकळा करू लागतो तेंव्हा समजुन जावं,  साहेब पडलेत कुठेतरी - प्रेमात. 
एकलकोंडा माणुस त्याच्या\तिच्या साथीने हळुहळु माणसात यायला लागतो, मित्र बनवायला शिकतो.  त्याला कळू लागतं कि ही दुनिया किती सुंदर आहे आणि चांगल्या लोकांनी भरलेली आहे.  आपण उगाच इतकी वर्षे आपल्या कोषात घालविली. 
किती हे प्रेमाचे सामर्थ्य जे एका प्रिय व्यक्तीसाठी सगळ्या जगाशी नाते जोडायची उर्मी माणसाला प्रदान करते.  जे म…

मी संस्कृती बोलते आहे

इमेज
संस्कृतीची सुरकुतलेली वस्त्रे पांघरण्यापेक्षा देवानं दिलेलं यौवन धन दिसु दे कि जगाला. त्यात वावगं काय आहे? उलट पुण्यच लाभेल.

हा सुविचार एके दिवशी युवकांच्या एका घोळक्यातुन कानावर आला. मी म्हटलं असेल बाबांनो, तसंही असेल. मला पटो न पटो हा प्रश्नच आता उरला नाही. कारण मी आता म्हातारी झाली आहे, वयानी नाही पण बहुधा विचारांनी. जग खुप पुढे गेलंय, उन्नत झालंय. माझी मात्र या वेगवान युगाशी जुळवुन घेतांना पुरती दमछाक झाली. आता हेच बघा ना सगळे अगदी गांधीजींच्या जीवनशैलीचं मनापासुन अनुकरण करत आहेत. आपण दोन कपडे कमी घातले तर कोण्या गरजु गरीब व्यक्तीला अंगावर घालायला कपडा मिळेल असं म्हणत गांधीजींनी एक वस्त्री पोशाख म्हणजे पंचाचा स्विकार केला होता. आजची युवा पिढी तर गांधीजींच्या दोन पावलं पुढेच आहे, कमी कपडे घालण्यात. एका पंचाच्या कापडात दोघं तिघं अगदी आरामात निभावुन नेतील. 

मी माझा पेहराव मोडीत काढु शकले नाही.


आणि हो स्त्री-पुरुष समानतेमुळे काय झक्कास प्रगती झाली आहे समाजाची. अगदी काही भेद राहिला नाही. अगदी म्हणजे क्रांतिकारी पिढी आहे बर का आजची.  स्त्री आजकाल केस खुरटे ठेवण्यात धन्यता मानते आणि पेहराव …