पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई

इमेज
ताण ताण म्हणजे कुणालातरी काहीतरी सिद्ध करून दाखवण्याचे बंधन, अपेक्षांवर खरे उतरण्याचे बंधन. आपण जर आपल्या गुणदोषांबद्दल साशंक असू तरच हा ताण येईल. आपण जर आपणाला संपूर्णपणे ओळखले असेल तर मग ना अपेक्षा उरतील आणि ना अपेक्षाभंग. अहंकार अहंकार म्हणजे स्वत:ला जगापासून वेगळे समजणे. ताण म्हणा, क्रोध म्हणा की आणखी कोणता विकार म्हणा, सर्वांचे मूळ अहंकारात आहे. जरी व्यावहारिक जगात वावरण्यासाठी, स्वत:चे रक्षण करण्यासाठी हा उपयुक्त आहे परंतु पुढे पुढे हा अहंकार नको तिथे नाक खुपसायला लागतो आणि आपल्या प्रगतीत अडसर ठरतो. कबीर कबीर क्या कहे , जाये गंगा तीर  | एक गोपी के प्रेम मे , बह गये लाख कबीर || मी म्हणजेच तो, तो म्हणजेच मी. मी म्हणजेच गुरू आणि गुरू म्हणजेच मी.  मी गुरूंचा श्रेष्ठ शिष्य आहे, किंवा माझे गुरू सर्वांहून श्रेष्ठ आहे अशी भावना जरी मनात आली की काम बिघडलंच समजा. सत्य सत्य ही खरं तर सांगायची गोष्ट नाही किंवा ती सांगितली जाऊच शकत नाही. सत्य हा एक अनुभव आहे. मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई ज्याप्रमाणे एखाद्या मुक्या माणसाने गूळ खाल्यावर इतरांनी कितीही विचारलं त