मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई



ताण

ताण म्हणजे कुणालातरी काहीतरी सिद्ध करून दाखवण्याचे बंधन, अपेक्षांवर खरे उतरण्याचे बंधन. आपण जर आपल्या गुणदोषांबद्दल साशंक असू तरच हा ताण येईल. आपण जर आपणाला संपूर्णपणे ओळखले असेल तर मग ना अपेक्षा उरतील आणि ना अपेक्षाभंग.


अहंकार

अहंकार म्हणजे स्वत:ला जगापासून वेगळे समजणे. ताण म्हणा, क्रोध म्हणा की आणखी कोणता विकार म्हणा, सर्वांचे मूळ अहंकारात आहे. जरी व्यावहारिक जगात वावरण्यासाठी, स्वत:चे रक्षण करण्यासाठी हा उपयुक्त आहे परंतु पुढे पुढे हा अहंकार नको तिथे नाक खुपसायला लागतो आणि आपल्या प्रगतीत अडसर ठरतो.

कबीर कबीर क्या कहे , जाये गंगा तीर  |
एक गोपी के प्रेम मे , बह गये लाख कबीर ||


मी म्हणजेच तो, तो म्हणजेच मी. मी म्हणजेच गुरू आणि गुरू म्हणजेच मी. 

मी गुरूंचा श्रेष्ठ शिष्य आहे, किंवा माझे गुरू सर्वांहून श्रेष्ठ आहे अशी भावना जरी मनात आली की काम बिघडलंच समजा.


सत्य

सत्य ही खरं तर सांगायची गोष्ट नाही किंवा ती सांगितली जाऊच शकत नाही. सत्य हा एक अनुभव आहे.

मुक्यानं खाल्ला गुई अन उई तमाशा उई

ज्याप्रमाणे एखाद्या मुक्या माणसाने गूळ खाल्यावर इतरांनी कितीही विचारलं तरी तो त्याचा अनुभव कथन करू शकत नाही. प्रत्येक मुक्याला, अज्ञानी माणसाला, ज्याचे त्याचे सत्य शोधावे लागते. परंतू सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करण्यासाठी गुरू आणि संतांना शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून हे लोक शब्द अगदी जपून वापरतात. जेवढ्या कमी शब्दांत काम होईल तेवढं चांगलं. नाहीतर लोक ह्या शब्दांनाच घट्ट पकडून ठेवतात, अर्थ मात्र निसटून जातो. म्हणूनच गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोधाची पारायणं होतात मात्र नरांचे नारायण होत नाहीत.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

मनाचा कळफलक