पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेलाची पानं आणि अलुवेरा

इमेज
एकदा तेरवीला एका खेड्यात गेलो होतो. कार्यक्रम आटोपला जेवणं झाली, मग दुपारी अडीचच्या सुमारास परतीस निघालो. चालत बस थांब्यावर आलो. तीन वाजताची बस होती. तिथे झाडाखाली ३-४ बाया आधीच बसल्या होत्या. हळुहळु तिथे गर्दी वाढत गेली. तेरवीला आलेली सगळी वयस्कर माणसं एक एक करून तिथे बसची वाट बघत थांबली. काही लोकांच्या दुचाक्या, फटफट्या होत्या त्यावर ३-३ माणसं बसुन गाव जवळ करू लागली. जास्तीत जास्त लोक आसपासच्या खेड्यावरील होते. शेती कामाचे दिवस. बस आली व पुढच्या गावाला निघुन गेली, जिथुन परतुन ती येणार होती. लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला चला, आता जाणं नक्की. कारण खेडेगावात बस हे मुख्य प्रवासी साधन असलं तरी हमखास येणारच याची खात्री आजच्या तारखेत पण कोणी देऊ शकत नाही. तसं झाल्यास मग ऑटोरिक्षा, ट्रॅॅक्टर, टेम्पो झालंच तर बैलगाडी अशा साधनांचा सहारा. तिकीटांचे दर आकाशाला भिडलेले असले तरी सामान्य माणुस एसटी काही सोडत नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे ह्या ना त्या कारणाने मिळणाऱ्या सवलती. जेष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट, अपंगांना पाव, विद्यार्थ्यांना बस पास वगैरे वगैरे भरपुर सवलती असतात. म्हणुन हे नातं अध

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद चौथा [रागावणारं मन]

इमेज
पांथ पहिला:   हे ऐका, एका प्रवचनातील वाक्य. क्रोधी और शराबी बिलकुल एक जैसे है. शराबी के कदम डगमगाते है क्रोधी के भी. शराबी बोलना कुछ चाहता है और बोल कुछ जाता है, क्रोधी भी. क्रोध में आदमी ऐसे काम कर देता है जो सिर्फ नशे में हि किये जा सकते है. शराबी होश में आने बाद पछताता है क्रोधी भी. दोनो कहते है फिर कभी न ऐसा न करुंगा लेकिन बार बार वही भुल करते रहते है. तुम्हाला काय वाटतं? पांथ दुसरा: क्रोध, राग. आपल्याला राग का येतो? जर एखादी घटना आपल्या मनाप्रमाणे घडली नाही किंवा कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही तर. पण अगदीच तसे नाही, रस्त्यावरच्या माणसांनी गाडी चुकीची चालवली तरी राग येतो. खर तर जे आत आहे तेच बाहेर येतं. नाहीतर एकाच प्रसंगाला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आल्या नसत्या. रागावणं हे बाहेरच झालं. राग का येतो हे शोधायला पाहिजे. तो आत कुठे आहे ते शोधायला पाहिजे. पांथ पहिला:   हो ना विचित्र आहे रागाचं कोडं. बर क्रोधाचा मुळ अहंकार आहे असं म्हटलं तर मग स्व:ताचा राग का येत असेल. पांथ दुसरा: अहो आपण स्वतः शी बोलतो सुद्धा. तसच स्व:तावर रागावतो. पांथ पहिला:   हो.  म्हणजे आपण दोन

कुत्रा पाळताय का?

इमेज
एक इमानदार पाळीव प्राणी अशी कुत्रा ह्या प्राण्याशी आपली ओळख आहे. आम्हाला आमचा खंड्या म्हणुन एक सुंदर धडा होता तिसरीत कि चवथीत. लहानपणी कुत्रा पाळण्याची हौस पण होती. पण घरच्यांनी पाळू दिला नाही. फार हट्ट केल्यावर मोहल्ल्यातील कुत्र्यांना खाऊ पिऊ घालणे त्यांचे लाड करणे इतपर्यंत मला सुट मिळाली पण पाळायला कधीच परवानगी मिळाली नाही.  तेंव्हा मला त्या गोष्टीचा फार राग येत असे पण मोठा झाल्यावर कळायला लागलं की कुत्रा पाळणं हे वाटते तितकं सोपं प्रकरण नाही. आणि मग हळुहळु आकर्षण पण कमी झालं. गावाकडे मोजक्या ३-४ घरी कुत्रा पाळलेला असायचा आणि त्याचं कारणही असायचं. एक तर तो मालकासोबत शेतावर सोकारीला(राखणीला) जायचा. किंवा गुरंढोरं, शेळ्यामेंढ्या चारायला गुराख्याला \ मालकाला मदत करायचा. पण सहज म्हणून कुत्रा पाळलेला असं क्वचित दिसायचं. गल्ल्याबोळात मात्र कुत्री असायची, गावातील वातावरणाचा ती एक अविभाज्य भाग होती. हळुहळु प्रगती झाली, शहरीकरणाने वेग घेतला, प्रसार माध्यम आली. जग जवळ आलं. जसं इतर बाबतीत होत आलय तसंच विदेशातील घरात प्राणी, विशेषतः कुत्रे, मांजरे पाळण्याची संस्कृती हळुहळु मोठ्या शहरात शि

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

इमेज
पांथ पहिला: नमस्कार! पांथ दुसरा: हरी ओम! पांथ पहिला:  कुठे होतात इतके दिवस? पांथ दुसरा:  अहो इतके दिवस काय म्हणताय, फक्त ४ दिवस झालेत आपल्याला भेटुन. पांथ पहिला:  हो का, पण खरच असं वाटतं कि चांगले ८-१० दिवस झाले असतील. कोणी बोलायलाच भेटत नाही हो. पांथ दुसरा:  का ते करमरकर दिसत आहेत तिकडे, ते लोखंडे, ते तिकडे देशमुख कसलं तरी आसन करत आहेत, पडतील वाटतं आता. पांथ पहिला:  हा हा! अहो तसे बरेच आहेत हो पण त्यांच्याशी तुमच्यासारख्या आध्यात्मिक चर्चा नाही करता येत ना. पांथ दुसरा:  हो ते आहेच म्हणा. पांथ पहिला:  बर एक विचार कि विधान वाचलं कुठेतरी तेंव्हापासुन तुमची वाट बघत होतो. हिंदीत वाचलं होतं म्हणुन हिंदीतच सांगतो, "बुढे होते होते सभी नास्तिक, आस्तिक हो जाते है. वो लोग तो प्रगाढ आस्तिक हो जाते है जिन्होने ईश्वर के अस्तित्व का जीवनभर प्रखरता से खंडन किया है, जैसे के वैज्ञानिक. मौत कि छाया पडने लगी तो ज्ञान कि अकड खोती जाती और अनजाने में समर्पण का भाव उठने लगता. वही समर्पण का भाव जो अगर सही वक्त पर उठने देते तो जीवन सार्थक हो सकता था. लेकिन हर बार उस भाव को ज्ञान और अहं

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद दुसरा

इमेज
पहिला पांथ: नमस्कार! दुसरा पांथ: नमस्कार, नमस्कार! नविन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! आज बरेच दिवसांनी भेटलात. पहिला पांथ:  तुम्हाला सुद्धा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!  थोडा बाहेरगावी गेलो होतो. दुसरा पांथ:  तेच म्हटलं. मागच्या वेळी आपला छान संवाद झाला होता. त्यानंतर काही योगच आला नाही. मग काय संकल्प नविन वर्षाचा? पहिला पांथ:  खरं तर विचार केलेला नाही मी. पण सध्या माझ्यासमोर असलेला प्रश्न म्हणजे वैराग्य जमवायला पाहिजे. किंवा त्यालाच वीतराग पण म्हणतात. ह्यालाच बनवावे म्हणतो संकल्प. दुसरा पांथ:  छान विचार आहे. पण खरच वीतरागी होणं कठीण काम आहे. मला वाटते बरेच लोक याच विवंचनेत असतील. मी पण आहे. माझ्यामते ती पंचवार्षिक योजना होईल. पहिला पांथ:  पंचवार्षिक कुठची, आयुष्य पण कमी पडेल. दुसरा पांथ:  हो म्हणजे सरकारी भाषेत कधीच पुर्ण न होणारी. कदाचित मागचं आयुष्य कमी पडलं म्हणुन या आयुष्यात धडपड चालु आहे. पहिला पांथ:  हो खरंय. मुलांना जन्माला घालायचं, गुंतायचं आणि नंतर त्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड. कशासाठी हा सगळा खटाटोप काही कळत नाही. मुलांसोबत राहुन त्यांच्यात न अड