पोस्ट्स

महती काय वर्णावी प्रेमाचिया !

इमेज
"हमे जबसे मोहोब्बत हो गयी है ये दुनिया खुबसुरत हो गयी है" खरंच, माणुस प्रेमात पडतो तेंव्हा त्याला सगळं चांगलं चांगलं दिसायला लागतं. तो प्रेमाखातर जगायला लागतो, उत्साही बनतो.  प्रत्येक दिवसाचं स्वागत मोठ्या आनंदानं करतो.  रात्र त्याला भारी जाते, प्रत्येक क्षण भरभरून जगण्याची उर्मी त्याला झोपू देत नाही.  कारण झोप म्हणजे त्या प्रिय व्यक्तीचा विसर, जो त्याला मान्य नसतो.  कितीही आळशी माणुस असो प्रेमात पडल्यावर तो लवकर उठायला लागतो.  त्याचं जीवन सकारात्मक उर्जेने भारून जातं.  एखादा कंजुस असलेला माणुस जेंव्हा प्रेमात पडतो तेंव्हा अचानक दान-धर्म करायला लागतो.  आपला एखादा चिक्कु मित्र एकाएकी जेंव्हा खिसा मोकळा करू लागतो तेंव्हा समजुन जावं,  साहेब पडलेत कुठेतरी - प्रेमात.  एकलकोंडा माणुस त्याच्या\तिच्या साथीने हळुहळु माणसात यायला लागतो, मित्र बनवायला शिकतो.  त्याला कळू लागतं कि ही दुनिया किती सुंदर आहे आणि चांगल्या लोकांनी भरलेली आहे.  आपण उगाच इतकी व...

मी संस्कृती बोलते आहे

इमेज
संस्कृतीची सुरकुतलेली वस्त्रे पांघरण्यापेक्षा देवानं दिलेलं यौवन धन दिसु दे कि जगाला. त्यात वावगं काय आहे? उलट पुण्यच लाभेल. हा सुविचार एके दिवशी युवकांच्या एका घोळक्यातुन कानावर आला. मी म्हटलं असेल बाबांनो, तसंही असेल. मला पटो न पटो हा प्रश्नच आता उरला नाही. कारण मी आता म्हातारी झाली आहे, वयानी नाही पण बहुधा विचारांनी. जग खुप पुढे गेलंय, उन्नत झालंय. माझी मात्र या वेगवान युगाशी जुळवुन घेतांना पुरती दमछाक झाली. आता हेच बघा ना सगळे अगदी गांधीजींच्या जीवनशैलीचं मनापासुन अनुकरण करत आहेत. आपण दोन कपडे कमी घातले तर कोण्या गरजु गरीब व्यक्तीला अंगावर घालायला कपडा मिळेल असं म्हणत गांधीजींनी एक वस्त्री पोशाख म्हणजे पंचाचा स्विकार केला होता. आजची युवा पिढी तर गांधीजींच्या दोन पावलं पुढेच आहे, कमी कपडे घालण्यात. एका पंचाच्या कापडात दोघं तिघं अगदी आरामात निभावुन नेतील.  मी माझा पेहराव मोडीत काढु शकले नाही. आणि हो स्त्री-पुरुष समानतेमुळे काय झक्कास प्रगती झाली आहे समाजाची. अगदी काही भेद राहिला नाही. अगदी म्हणजे क्रांतिकारी पिढी आहे बर का आजची.  स्त्री आजकाल केस खुरटे ठेवण्यात धन्य...

प्रेम हे एकतर्फीच असतं

इमेज
प्रेम हे एकतर्फीच असतं, कारण प्रेम हे नेहमी निर्व्याज आणि निस्वार्थी असतं. प्रेमात पडलेला माणुस हा फक्त देतो, देतो आणि देत राहतो. मी इतकं प्रेम करतोय तर समोरच्याने पण माझ्यावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे हा हिशेबी विचार त्याच्या मनात कधीच येत नाही. तराजुत तोलल्या जाणारं ते प्रेम नव्हे.  मी तुझ्यावर प्रेम करतो अशी शाब्दिक व्यक्तता जिथे वारंवार होते तिथे बहुतेक प्रेम निखालस नसावं. कारण  मी तुझ्यावर प्रेम करतो  म्हणणाऱ्या माणसाला समोरच्याकडून  मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो  हे उत्तर अपेक्षित असतं. आणि ते मिळालं नाही कि त्याचा त्याला त्रास होतो. म्हणजे हि फक्त एक प्रकारची  देवाण घेवाण असते. प्रेम ही काही बोलुन सिद्ध करण्याची गोष्ट नाही. सहसा आपल्या कृतीतुन आपण  प्रेमाची व्यक्तता करीत असतो. प्रेमाची प्रचिती, जाणीव हि प्रामुख्याने भावनात्मक पातळीवर असते.  आजकाल प्रेम हा शब्द फार सहज आणि सैल रीत्या वापरल्या जातो. एकेमेकांविषयी शारीरिक आकर्षण आणि विषय वासना दर्शविण्यासाठी हा शब्द लोक बिनधास्त वापरतात त्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ आणि भावार्थ दोन्ही ग...

बेलाची पानं आणि अलुवेरा

इमेज
एकदा तेरवीला एका खेड्यात गेलो होतो. कार्यक्रम आटोपला जेवणं झाली, मग दुपारी अडीचच्या सुमारास परतीस निघालो. चालत बस थांब्यावर आलो. तीन वाजताची बस होती. तिथे झाडाखाली ३-४ बाया आधीच बसल्या होत्या. हळुहळु तिथे गर्दी वाढत गेली. तेरवीला आलेली सगळी वयस्कर माणसं एक एक करून तिथे बसची वाट बघत थांबली. काही लोकांच्या दुचाक्या, फटफट्या होत्या त्यावर ३-३ माणसं बसुन गाव जवळ करू लागली. जास्तीत जास्त लोक आसपासच्या खेड्यावरील होते. शेती कामाचे दिवस. बस आली व पुढच्या गावाला निघुन गेली, जिथुन परतुन ती येणार होती. लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला चला, आता जाणं नक्की. कारण खेडेगावात बस हे मुख्य प्रवासी साधन असलं तरी हमखास येणारच याची खात्री आजच्या तारखेत पण कोणी देऊ शकत नाही. तसं झाल्यास मग ऑटोरिक्षा, ट्रॅॅक्टर, टेम्पो झालंच तर बैलगाडी अशा साधनांचा सहारा. तिकीटांचे दर आकाशाला भिडलेले असले तरी सामान्य माणुस एसटी काही सोडत नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे ह्या ना त्या कारणाने मिळणाऱ्या सवलती. जेष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट, अपंगांना पाव, विद्यार्थ्यांना बस पास वगैरे वगैरे भरपुर सवलती असतात. म्हणुन हे नातं अध...

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद चौथा [रागावणारं मन]

इमेज
पांथ पहिला:   हे ऐका, एका प्रवचनातील वाक्य. क्रोधी और शराबी बिलकुल एक जैसे है. शराबी के कदम डगमगाते है क्रोधी के भी. शराबी बोलना कुछ चाहता है और बोल कुछ जाता है, क्रोधी भी. क्रोध में आदमी ऐसे काम कर देता है जो सिर्फ नशे में हि किये जा सकते है. शराबी होश में आने बाद पछताता है क्रोधी भी. दोनो कहते है फिर कभी न ऐसा न करुंगा लेकिन बार बार वही भुल करते रहते है. तुम्हाला काय वाटतं? पांथ दुसरा: क्रोध, राग. आपल्याला राग का येतो? जर एखादी घटना आपल्या मनाप्रमाणे घडली नाही किंवा कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही तर. पण अगदीच तसे नाही, रस्त्यावरच्या माणसांनी गाडी चुकीची चालवली तरी राग येतो. खर तर जे आत आहे तेच बाहेर येतं. नाहीतर एकाच प्रसंगाला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आल्या नसत्या. रागावणं हे बाहेरच झालं. राग का येतो हे शोधायला पाहिजे. तो आत कुठे आहे ते शोधायला पाहिजे. पांथ पहिला:   हो ना विचित्र आहे रागाचं कोडं. बर क्रोधाचा मुळ अहंकार आहे असं म्हटलं तर मग स्व:ताचा राग का येत असेल. पांथ दुसरा: अहो आपण स्वतः शी बोलतो सुद्धा. तसच स्व:तावर रागावतो. पांथ पहिला:   हो. ...

कुत्रा पाळताय का?

इमेज
एक इमानदार पाळीव प्राणी अशी कुत्रा ह्या प्राण्याशी आपली ओळख आहे. आम्हाला आमचा खंड्या म्हणुन एक सुंदर धडा होता तिसरीत कि चवथीत. लहानपणी कुत्रा पाळण्याची हौस पण होती. पण घरच्यांनी पाळू दिला नाही. फार हट्ट केल्यावर मोहल्ल्यातील कुत्र्यांना खाऊ पिऊ घालणे त्यांचे लाड करणे इतपर्यंत मला सुट मिळाली पण पाळायला कधीच परवानगी मिळाली नाही.  तेंव्हा मला त्या गोष्टीचा फार राग येत असे पण मोठा झाल्यावर कळायला लागलं की कुत्रा पाळणं हे वाटते तितकं सोपं प्रकरण नाही. आणि मग हळुहळु आकर्षण पण कमी झालं. गावाकडे मोजक्या ३-४ घरी कुत्रा पाळलेला असायचा आणि त्याचं कारणही असायचं. एक तर तो मालकासोबत शेतावर सोकारीला(राखणीला) जायचा. किंवा गुरंढोरं, शेळ्यामेंढ्या चारायला गुराख्याला \ मालकाला मदत करायचा. पण सहज म्हणून कुत्रा पाळलेला असं क्वचित दिसायचं. गल्ल्याबोळात मात्र कुत्री असायची, गावातील वातावरणाचा ती एक अविभाज्य भाग होती. हळुहळु प्रगती झाली, शहरीकरणाने वेग घेतला, प्रसार माध्यम आली. जग जवळ आलं. जसं इतर बाबतीत होत आलय तसंच विदेशातील घरात प्राणी, विशेषतः कुत्रे, मांजरे पाळण्याची संस्कृती हळुहळु मोठ्या शहरा...

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

इमेज
पांथ पहिला: नमस्कार! पांथ दुसरा: हरी ओम! पांथ पहिला:  कुठे होतात इतके दिवस? पांथ दुसरा:  अहो इतके दिवस काय म्हणताय, फक्त ४ दिवस झालेत आपल्याला भेटुन. पांथ पहिला:  हो का, पण खरच असं वाटतं कि चांगले ८-१० दिवस झाले असतील. कोणी बोलायलाच भेटत नाही हो. पांथ दुसरा:  का ते करमरकर दिसत आहेत तिकडे, ते लोखंडे, ते तिकडे देशमुख कसलं तरी आसन करत आहेत, पडतील वाटतं आता. पांथ पहिला:  हा हा! अहो तसे बरेच आहेत हो पण त्यांच्याशी तुमच्यासारख्या आध्यात्मिक चर्चा नाही करता येत ना. पांथ दुसरा:  हो ते आहेच म्हणा. पांथ पहिला:  बर एक विचार कि विधान वाचलं कुठेतरी तेंव्हापासुन तुमची वाट बघत होतो. हिंदीत वाचलं होतं म्हणुन हिंदीतच सांगतो, "बुढे होते होते सभी नास्तिक, आस्तिक हो जाते है. वो लोग तो प्रगाढ आस्तिक हो जाते है जिन्होने ईश्वर के अस्तित्व का जीवनभर प्रखरता से खंडन किया है, जैसे के वैज्ञानिक. मौत कि छाया पडने लगी तो ज्ञान कि अकड खोती जाती और अनजाने में समर्पण का भाव उठने लगता. वही समर्पण का भाव जो अगर सही वक्त पर उठने देते तो जीवन सार्थक हो सकता था. लेकिन ...

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद दुसरा

इमेज
पहिला पांथ: नमस्कार! दुसरा पांथ: नमस्कार, नमस्कार! नविन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! आज बरेच दिवसांनी भेटलात. पहिला पांथ:  तुम्हाला सुद्धा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!  थोडा बाहेरगावी गेलो होतो. दुसरा पांथ:  तेच म्हटलं. मागच्या वेळी आपला छान संवाद झाला होता. त्यानंतर काही योगच आला नाही. मग काय संकल्प नविन वर्षाचा? पहिला पांथ:  खरं तर विचार केलेला नाही मी. पण सध्या माझ्यासमोर असलेला प्रश्न म्हणजे वैराग्य जमवायला पाहिजे. किंवा त्यालाच वीतराग पण म्हणतात. ह्यालाच बनवावे म्हणतो संकल्प. दुसरा पांथ:  छान विचार आहे. पण खरच वीतरागी होणं कठीण काम आहे. मला वाटते बरेच लोक याच विवंचनेत असतील. मी पण आहे. माझ्यामते ती पंचवार्षिक योजना होईल. पहिला पांथ:  पंचवार्षिक कुठची, आयुष्य पण कमी पडेल. दुसरा पांथ:  हो म्हणजे सरकारी भाषेत कधीच पुर्ण न होणारी. कदाचित मागचं आयुष्य कमी पडलं म्हणुन या आयुष्यात धडपड चालु आहे. पहिला पांथ:  हो खरंय. मुलांना जन्माला घालायचं, गुंतायचं आणि नंतर त्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड. कशासाठी हा सगळा खटाटोप काही कळ...

अज्ञाताचा शोध संवादमाला

माणसाच्या आयुष्यात कधी तरी अशी अवस्था येते जेंव्हा त्याला कशाचा तरी शोध खुणावु लागतो. पण कशाचा? ती वस्तु आहे कि फक्त अनुभुती. ह्या जगातील आहे कि परलोकीय? या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला कितीतरी प्रश्न भेडसावत असतात. अशाच दोन पांथांमधील ह्या शोधाच्या वाटेवर उलगडत घडणारे हे संवाद आपण या सदरातुन बघणार आहोत.  संवाद पहिला पहिला पांथ: मी खरंच कशाच्या शोधात आहे? देवाच्या? लहानपणापासुन देवाबद्दल ऐकलय पण त्या संकल्पनेचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही. ह्याचा काय अर्थ काढायचा? देवाबद्दल माझी जी काही थोडीफार समज किंवा धारणा आहे त्याला सुसंगत असं काही ऐकायला मिळालं तर तिकडं मन आकर्षित होतं? पण मी या मार्गावर का आहे? मी काय शोधत आहे? दुसरा पांथ: माणुस हा एकच असा प्राणी आहे पृथ्वीवर ज्याच्या अंतरात अज्ञाताचा वेध घेण्याची हि ओढ आहे. आणि प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न उठणं अगदी स्वाभाविक आहे. फक्त कोणाच्या मनात ते थोडे लवकर उठायला लागतात तर कोणाच्या मनात उशीरा. पण हे लवकर उशिरा ह्या आयुष्याच्या नव्हे तर आत्म्याच्या प्रवासाच्या संदर्भात आहे. मला माहित आहे मी आणखी एक गुढ शब्द वापरतोय 'आत्मा'. ...

अंधानुकरणाचा (भि)कारनामा

इमेज
गरज नसतांना वापरल्या जाणाऱ्या वस्तुंचा किंवा सुविधांचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होत असतो. हे कळत असले तरी वळत बऱ्याच लोकांना नाही. कोणत्याही गावाचा किंवा शहराचा विकास होत असतांना काही गोष्टी घडत जातात जसे कि रस्ते रुंद होणे, त्यावर दिवे लागणे, सुशोभीकरण, मोठाली दुकानं उघडणे, एकंदरीत सगळीकडे झगमगाट दृष्टीस पडायला लागतो. विकास आणि अर्थव्यवस्था यांचं जवळचं नातं आहे. लोकांची क्रय शक्ती वाढली कि बाजारपेठ मोठी होते आणि त्याला अनुसरून शहराचा ही विकास होत राहतो. शहरात जाहिराती वाढायला लागतात ज्यात लोकांसाठी वेगवेगळी प्रलोभनं असतात. एकावर एक मोफत, २५ टक्के अधिक, १००० रुपयांच्या खरेदीवर एक भेटवस्तु वगैरे वगैरे. आणि लोक ह्या ना त्या प्रकारे प्रलोभनांना बळी पडतातच. वर्षानुवर्षे वापरलेली स्थानिक उत्पादनं सोडुन नामांकित कंपन्यांची उत्पादनं वापरायला सुरु करतात. सोयी सुविधा विकत घेऊन बदल्यात स्वस्थ जीवनशैलीचा परिहार करतात. मी पण माझ्या शहरात होणारी हि स्थित्यंतरं बघितली आणि अनुभवली आहे. ह्या काळात माणसांमध्ये होणारी मनोस्थित्यंतरं तर खुपच बोलकी, आश्चर्यास्पद आणि कधी कधी अंतर्मुख करणारी असतात. महानग...