अणे आणि चणे

एक होता अणे 
मोठा साहेब होता म्हणे
त्याची बुद्धी फिरली
आता धंदा करतो म्हणे


नोकरी दिली सोडुन
गावी परत आला
चौकाचौकात फिरून
चणे विकु लागला


चणे घ्या चणे
चाराण्याचे चणे
छान छान चणे
विदर्भाचे चणे


चणे कोणी घेईना
अण्याला भाव देईना
अणे झाला खट्टु
लागला हात पाय आपटु


अण्याने लढविली अक्कल
त्याला सुचली शक्कल
घेऊन गेला चणे
फोडुन आणले फुटाणे


फुटाणे घ्या फुटाणे
चाराण्याचे फुटाणे
छान छान फुटाणे
विदर्भाचे फुटाणे


फुटाणे कोणी घेईना
अण्याला भाव देईना
अण्याची झाली फजिती
लपु कुठे अन लपु किती


अण्याच्या आले लक्षात
गाजराने आपला केला घात
मुंबई गेली पुणेही गेले
हाती केवळ धुपाटणे आले


ओरडुन ओरडुन थकला अणे 
खाऊन टाकले सगळे फुटाणे


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी