एक होता फुकट्यांचा देश
सध्याच्या भारत शासन तथा राज्य शासन यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा अभ्यास केला अस ता भारत हा लवकरच एक फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे . जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा अशी परिस्थिती आज भारतात सगळीकडे आहे . येथील जनतेला सुविधा व विकास तर ह वा आहे पण क्तिक स्वा र्थापुढे त्या गौण ठ तात . घरासमोरील रस्त्याऐवजी प्रत्येक घरी हजार रुपये वाटले की काम झाले . नेमकी हीच मानसिकता ओळखून राजकारण्यांनी फुकटखोरीचा सपाटाच लावला आहे . फुकट मिळाल्यास विष पण विकत घेणार अशी मानसिकता समाजात होऊन बसली आहे . गरज नसतांना महिला गावोगावी फिरत आहेत . तीर्थाटनाला तर जसे उधाण आले आहे . परिस्थिती ही आहे की बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही . निराधार योजना आणली पण भक्कम आधार असणारे लोक सुद्धा या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत . मोफत योजनांचा पाऊस पडत आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मोफत घरे , पाच लाखापर्यंतचे आरोग्य विमे , मोफत धान्य . थोडक्यात काय तर मध्यमवर्गीय , नोकरदार , आणि करदाते सोडले तर एकही घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही . वरून जनतेची ओरड आहे की