समलैंगिकता आणि सामाजिक प्रदुषण




समलैंगिकतेस मान्यता न देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याला तीन वर्षे होत आली. अधुन मधुन त्यावर फेरविचार याचिका वगैरे दाखल करण्यात आल्या. आणि ब-याच प्रतिक्रिया प्रकट झाल्या. काही समाधानाच्या काही नाराजीच्या काही भंपकपणाच्या तर काही प्रामाणिक. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता गुन्हा नाही असा निवाडा दिला. यासाठी कि निकालात स्पष्ट म्हटलेलं आहे कि समलैंगिकता नैसर्गिक नाही. यावर आपण फार हुरळुन वगैरे न जाता गंभीर विचार केला पाहिजे.  निसर्गाने जी काम भावना प्राण्यांना दिलेली आहे तिचं मूळ प्रयोजन हे प्रजनन होय जेणेकरून जीवन चक्र या पृथ्वीतलावर अखंडित चालत राहावं. लिंग हे संभोगाचं साधन आहे. लिंगावरून लैंगिकता ठरते. पुरुष लिंग असल्यास निसर्गत: प्राण्याला मादीचं आकर्षण असतं. आणि स्त्री लिंग असल्यास नराचं आकर्षण असतं. जर कुणाला असं विरुद्धलिंगी आकर्षण नसेल किंवा समलिंगी किंवा उभयलिंगी आकर्षण असेल तर त्या व्यक्तीमध्ये तो जैविक, मानसिक अथवा दोन्ही पातळीवरचा दोष आहे असं आपण म्हणू शकतो.

हा दोष इतर प्राण्यांत आढळत नाही. आतापर्यंत जे काही संशोधक अभ्यास यावर झाले आहेत त्यांच्याकडे अजूनही यावर ठोस किंवा भरघोस प्रमाण नाही. एक सामान्य माणूस म्हणून जर मी आठवायला बसलो तर मला एकही प्रसंग आठवत नाही कि मी कुत्र्यांमध्ये असे काही बघितले किंवा एक रेडा दुस-या रेड्यावर चढताना बघितला किंवा एक चिमणी दुस-या चिमणीसोबत संभोग करतेय. अर्थात हे मी माझ्या निरीक्षणानुसार आणि जेवढं माझं ज्ञान आहे त्यावरूनच सांगतोय. हं आता माणसाप्रमाणेच प्राणीही जर का आपली समलैंगिकता लपवून ठेवत असतील तर कदाचित शक्य आहे पण असं समजणं अतिरेक होईल. लपवून असे काही व्यवहार करणे हे फक्त मनुष्य प्राण्यालाच शक्य आहे कारण त्याची बुद्धी. त्याला हे नक्की माहित असतं कि मी जे करतोय हा माझ्यातला एक दोष आहे आणि असं काही आचरण करणं अवैध किंवा अमान्य आहे.

माणसात हे दोष कुठून आलेत याचा विचार करता इतिहासात थोडं मागे जावं लागतं( प्रदेशाचा उल्लेख टाळून बोलूया). जेंव्हा जगात सगळीकडे राजेशाही सत्ता होत्या, युद्ध आणि लढाया हे जीवनाचा अविभाज्य भाग होतं तेंव्हा गुलामगिरी हि सर्वमान्य होती. काही जातींनिहाय तर काही युध्द कैदी असे शेकडो गुलाम राज घराण्यांकडे असत. गुलामांचा मुख्य वापर हा मजुरीसाठी आणि बळासाठी होत होता तसेच तो मनोरंजनासाठीही होत होता. गुलाम स्त्रिया ह्या मुख्यत्परत्वे नाच गाण्यासाठी आणि कामपूर्तीसाठी कामवस्तू म्हणून वापरल्या जात. मनोरंजनाचे वेगवेगळ्या शकला डोक्यातून काढून त्या राजा आणि त्याच्या मंत्र्यांसमोर प्रस्तुत करणे हि जबाबदारी तेंव्हा राज दरबारी असलेल्या काही लोकांकडे असायची. याच गुलामगिरीच्या वाटेवर मनकामपुर्ती करिता प्रथम स्त्री समलैंगिकतेचा प्रादुर्भाव झाला. आणि तो वेगात पसरला जे अगदी क्रमप्राप्त होतं. ह्याच विकृत मनोरंजनाची पुढची पायरी म्हणजे पुरुष समलैंगिकता. पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या ह्या गुलामगिरीच्या काळात गुलामांना पिढ्यानपिढ्या हि विकृती सहन करावी लागली आणि जी नंतर त्यांना अंगवळणी पडली. समलैंगिकतेचं हे विष अनाचारासाठी पसरत गेलं. आणि आज आपण इथवर येऊन पोहचलो कि समलैंगिकता नैसर्गिक नाही हेदेखील मानायला कोणी तयार नाही. गुलामगिरीतून पडलेलं हे बीज आज कित्येक लोकांना गुलाम करून बसलय. बऱ्याच लोकांमध्ये यामुळे जनुकीय प्रदूषण होऊन आज समलैंगिकता हि अनुवांशिक आजार म्हणून पण सिध्द झालाय.

समलैंगिकता मुळात एक दोष आहे आणि या दोषावर उपाय केले जाऊ शकतात. दीर्घ समुपदेशन आणि योग्य उपचारानंतर या विकृतीवर हळू हळू पायबंद घालता येऊ शकतो. ज्यांच्यामध्ये जनुकीय प्रदूषणामुळे हि विकृती आली असेल त्यांना कदाचित एका पिढीत निर्दोष करणं शक्य नाही पण दोष आहे हे मान्य करून उपचार घेत राहिलं तर पुढच्या पिढ्या दोषमुक्त होण्याची दाट शक्यता आहे. चार भिंतींच्या आत तुम्ही समलैंगिक आहे कि नाही याचा कोणाला काही आक्षेप नसावा पण त्याला मान्यता देणे हे खचितच चुकीचं आहे. थोडा अभ्यास केला तर कळेल कि भिन्नलैंगिक संबंधांमध्ये पण काही कृत्ये अनैसर्गिक ठरतात. आणि त्यासाठी कायद्यात गुन्ह्याची तरतूद आहे. पण जोवर त्या गोष्टी दोन व्यक्तींच्या परस्पर संमतीने होतात आणि चार भिंतींच्या आत होतात तोपर्यंत कोणीही त्यात दखल देऊ शकत नाही आणि देऊ नयेही. हेच समलैंगिकतेला पण लागू आहे. त्याला कायद्याची गरज नाही. पण ज्या गोष्टी समाजाभिमुख होतात किंवा ज्यांचा समाजावर परिणाम होऊ शकतो तिथे नक्कीच कायदा असावा आणि विधायक असावा.

राजकीय नेते जेंव्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नाराजीचं भाष्य करतात त्यांचं मला काही वाटत नाही कारण ती एक वेगळी जात आहे. त्यांना कोणत्याही माणसात फक्त एक मत काय ते दिसत असतं. ते एक मत जाऊ नये म्हणून ते स्वत:ला पण कित्येकदा शिव्या घालायची तयारी ठेवतात. पण जेंव्हा समाजातील इतर घटक यावर भाष्य करतात तेंव्हा हा थोडा काळजीचा विषय ठरतो. त्याचं कारण असं कि जर भाष्य योग्य आणि विधायक असेल तर ठीक पण जर ते समाजाच्या हिताचं नसेल तर जे लोक या भाष्याला योग्य मानून त्या प्रवाहात सामील होतात ते त्यांच्याही अपरोक्ष समाज पतनात सामील होतात. हा एक प्रकारे सामाजिक वैचारिकतेचा बलात्कारच म्हणायला हवा.

समलैंगिकतेस एककल्ली मान्यता देण्याआधी त्याच्या परिणामांवर सारासार आणि खुप खोलवर विचार व्हायला हवा.


लैंगिकता हि कशाही प्रकारची असो ती नैसर्गिकच असते असे म्हणत आज जे लोक एका दोषाला विकृतीला मान्यता मिळावी म्हणून चळवळ करीत आहेत, तर मग एक दोन शतकानंतर काही लोक आम्हाला प्राण्यांसोबत लैंगिक संबंध ठेवायचे आहेत म्हणून आपापले पाळीव प्राणी घेऊन रस्त्यांवर मोर्चे काढतील. यात मला आजच काही अतिरंजित वाटत नाही. जे समलैंगिक नसलेले लोक समलैंगिकतेचे समर्थन करतात त्यांनी वाळुत डोके खुपसुन बसलेले शहामृग न बनता स्वत:ला आधी गंभीर प्रश्न विचारायला हवे:



१) तुमच्या मुला किंवा मुलीसाठी समलैंगिक जोडीदार शोधण्याची तयारी आहे का?


२) तुमच्या शेजारी समलैंगिक जोडपं रहायला आलेलं तुम्हाला रुचेल का?


३) समलैंगिक जोडप्याने समजा कसेही करून एखादं मुलं मिळवलं, तर त्या मुलाची काहीही चुक नसतांना त्याच्या आयुष्यात येणा-या गोंधळाची तुम्हाला कल्पना करवते का?


४) भविष्यात बहुलैंगिकतेला पण मान्यता मिळाल्यास मग कामपुर्तीसाठी ३-४ लोकांनी एकत्र राहायचे का?


५) फक्त लैंगिक ईच्छापुर्ती साठी माणसाने सामाजिक बांधिलकी झुगारून निव्वळ प्राणी व्हायचं का?




अशा विषयांवर चर्चा करतांना दुस-या देशांच्या उदार मतवादाचं उदाहरण देतांना फक्त प्रकाशाची बाजू बघायची नसते. घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ते देश कोणत्या समस्यांना सामोरे जाताहेत याचा पण अभ्यास आपण केला पाहिजे. उदाहरणादाखल एक संकेतस्थळ देतोय. कृपया त्याचे वाचन करावे.

http://www.frc.org/homosexuality




हा विषय नुसता वैचारिक किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा नाही. हा विषय सामाजिक आरोग्याचा आहे कारण मुळात मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे म्हणून भविष्यात आपणाला कसा समाज अवती भवती हवा आहे त्यानुसार आपली सामाजिक विचारसरणी आणि वागणूक असायला हवी. तेंव्हा काहीही मत प्रकट करण्याआधी ह्या विषयावर सखोल चिंतन केलेले बरे.



सकाळ मधील एक याच विषयावरील लेख समुपदेशनाचा मार्ग सुचवितो


‘त्या’ची घरवापसी (उत्तम कांबळे)



*** धन्यवाद ***

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

एक छोटीशी पुडी

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा