आपण तयार आहोत का?

जगाच्या निर्मितीपासूनच सगळा डोलारा अद्यापही निसर्गाने अगदी व्यवस्थित सांभाळला आहे आणि त्यामुळेच उत्क्रांती प्रक्रियेतून मानवाची निर्मिती शक्य झाली. मानवाला कधी कधी ह्या गोष्टीचा विसर पडतो आणि मग त्याला आठवण करून देण्यासाठी निसर्ग आपली खेळी करतो. जगात कोरोना साथीची सुरुवात होऊन जवळ जवळ दहा महिने होत आले. आणि संपूर्ण धोका टळायला दोनेक वर्षे तरी लागतील. त्यानंतर कदाचित मग ही साथ इतिहासात जमा होईल घेतलेल्या बळींच्या संख्येसहीत. अशा महामारीच्या निवारणात घडलेल्या इतिहासातील चुकांमधून आपण काही शिकलो आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. गेल्या तीनशे वर्षात विज्ञान क्षेत्रात झालेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेता आपण मानवजातीने एव्हाना अशा संकटांसाठी तयार असायला हवे होते, पण तसे होत नसते. प्रगतीचे परिणाम हे सर्वंकष असतात, त्याची फक्त उजवी बाजू लक्षात घेऊन स्वत:ची पाठ थोपटत राहिल्यास, एक डोळ्यांनी न दिसू शकणारा विषाणूसम जीव देखील तुम्हाला नामोहरम करून तुमची पायरी दाखवून देऊ शकतो. कोरोना महामारीच्या फैलावात चीनचा सहभाग हा आंतराष्ट्रीय अन्वेषणाचा विषय आहे म्हणून सध्यातरी आपण ही साथ ...