अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद चौथा [रागावणारं मन]
पांथ पहिला: हे ऐका, एका प्रवचनातील वाक्य. क्रोधी और शराबी बिलकुल एक जैसे है. शराबी के कदम डगमगाते है क्रोधी के भी. शराबी बोलना कुछ चाहता है और बोल कुछ जाता है, क्रोधी भी. क्रोध में आदमी ऐसे काम कर देता है जो सिर्फ नशे में हि किये जा सकते है. शराबी होश में आने बाद पछताता है क्रोधी भी. दोनो कहते है फिर कभी न ऐसा न करुंगा लेकिन बार बार वही भुल करते रहते है. तुम्हाला काय वाटतं? पांथ दुसरा: क्रोध, राग. आपल्याला राग का येतो? जर एखादी घटना आपल्या मनाप्रमाणे घडली नाही किंवा कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही तर. पण अगदीच तसे नाही, रस्त्यावरच्या माणसांनी गाडी चुकीची चालवली तरी राग येतो. खर तर जे आत आहे तेच बाहेर येतं. नाहीतर एकाच प्रसंगाला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आल्या नसत्या. रागावणं हे बाहेरच झालं. राग का येतो हे शोधायला पाहिजे. तो आत कुठे आहे ते शोधायला पाहिजे. पांथ पहिला: हो ना विचित्र आहे रागाचं कोडं. बर क्रोधाचा मुळ अहंकार आहे असं म्हटलं तर मग स्व:ताचा राग का येत असेल. पांथ दुसरा: अहो आपण स्वतः शी बोलतो सुद्धा. तसच स्व:तावर रागावतो. पांथ पहिला: हो. ...