बिचारी 'बुलेट'
'बुलेट' ही रुबाबदार गाडी आठवते का तुम्हाला. तुम्ही म्हणाल, म्हणजे काय ती गाडी काय कोणी विसरू शकेल? खरंय! ही गाडी आधी कधी कधीच रस्त्यावर दिसायची आणी दिसली कि तिच्या दिमाखदार आणि डौलदार रपेटीवरून नजर हटायची नाही. तिचा तो भारदस्तपणा आणि इंजिनच्या फायरिंगची भेदकता तुम्हाला जागेवर खिळवुन ठेवण्यास समर्थ होते. तिच्यावरून रपेट मारणारे स्वार पण आधी तश्याच शरीरयष्टीचे असायचे आणि बुलेट आणि तो स्वार हे एकमेकांना पूरक असल्यामुळे बघणाऱ्यावर एक वेगळीच छाप पडत असे. पण आजकाल बुलेट चालविणे हि एक फॅशन बनलेली आहे. लोकांकडे बक्कळ पैसा खेळायला लागल्यापासुन उठ सूट कुठल्याही गोष्टीची फॅशन बनायला आता वेळ लागत नाही. आणि त्यामुळेच कधी कधी जे बघाव लागतं ते अगदी विनोदीपासून ते विभत्सपर्यंत काहीही असु शकतं. रस्त्यावरून बुलेट जाणं हि आता नवलाई राहिली नसुन जवळ जवळ डोकेदुखी झालेली आहे. बुलेट बनविऱ्याणे कधी स्वप्नातही विचार केला नसेल कि हि गाडी दररोज कार्यालयात येण्याजाण्यासाठी सुध्दा वापरल्या जाईल. पण आज तुम्ही बघा, जो नव्हे तो तुम्हाला बुलेट चालवितांना दिसेल. त्यातले अर्धेअधिक चालक तर गाडीला शोभ...