अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद दुसरा
पहिला पांथ: नमस्कार! दुसरा पांथ: नमस्कार, नमस्कार! नविन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! आज बरेच दिवसांनी भेटलात. पहिला पांथ: तुम्हाला सुद्धा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! थोडा बाहेरगावी गेलो होतो. दुसरा पांथ: तेच म्हटलं. मागच्या वेळी आपला छान संवाद झाला होता. त्यानंतर काही योगच आला नाही. मग काय संकल्प नविन वर्षाचा? पहिला पांथ: खरं तर विचार केलेला नाही मी. पण सध्या माझ्यासमोर असलेला प्रश्न म्हणजे वैराग्य जमवायला पाहिजे. किंवा त्यालाच वीतराग पण म्हणतात. ह्यालाच बनवावे म्हणतो संकल्प. दुसरा पांथ: छान विचार आहे. पण खरच वीतरागी होणं कठीण काम आहे. मला वाटते बरेच लोक याच विवंचनेत असतील. मी पण आहे. माझ्यामते ती पंचवार्षिक योजना होईल. पहिला पांथ: पंचवार्षिक कुठची, आयुष्य पण कमी पडेल. दुसरा पांथ: हो म्हणजे सरकारी भाषेत कधीच पुर्ण न होणारी. कदाचित मागचं आयुष्य कमी पडलं म्हणुन या आयुष्यात धडपड चालु आहे. पहिला पांथ: हो खरंय. मुलांना जन्माला घालायचं, गुंतायचं आणि नंतर त्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड. कशासाठी हा सगळा खटाटोप काही कळ...