पुस्तक समीक्षा - पडघम [रवींद्र शोभणे]

प्रकाशन: मॅजेस्टिक पृष्ठसंख्या: ६८२ किंमत: ४५० रु. महिन्याभरापूर्वी लेखक रवींद्र शोभणे यांची 'पडघम' हि कादंबरी हाती लागली. चांगले भारी भरकम ६८० पानांचे हे लिखाण आहे. वाचनालयातुन आणतांना थोडी चाळली तर बरी वाटली. कॉंग्रेस, आणीबाणी, इंदिरा गांधी, जनता दलाचा उदय आणि अस्त अशा राजकिय अंगाने जाणारी ती वाटली. एवढे मोठे पुस्तक वाचुन काढणे म्हणजे वेळेचं नियोजन आलं. मी जिद्दीने ती वाचायला सुरु केली. परंतु ३०-४० पानं संपता संपता खरे स्वरूप समोर आले. तिचा मुळ गाभा दलित विरुध्द ब्राम्हण संघर्ष असुन तो प्रभावी बनविण्यासाठी तत्कालीन राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि नाते संबंधातील गुंतागुंत या गोष्टींचा आधार घेतला आहे. असे नसल्यास मग लेखकाचा उद्देश्य वाचकापर्यंत स्पष्ट पोहोचलेला नाही हे नक्की समजावे. हि एक राजकीय कादंबरी नक्कीच नाही त्यामुळे ज्य...